logo

डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू प्रायमरी हायस्कूल या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान



**पत्रकार दिनानिमित्त रिसोड शहरातील सर्व पत्रकारांचे स्वागत संपन्न**

महेंद्र कुमार महाजन रिसोड:

डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू प्रायमरी, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (सायन्स व आर्ट्स), रिसोड यांच्या वतीने *पत्रकार दिना*च्या निमित्ताने रिसोड शहरातील सर्व पत्रकारांचे स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद कबीर मोसिन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून , पी डी पाटील सर, अर्जुन खरात, महेंद्र महाजन रवी अंभोरे सर शितल धांडे शेख अन्सारुद्दीन शेख नाझीम नारायण आरु शेख सरवर, विनोद बोडके, विनोद खडसे, सतीश मांदळे, गजानन हजारे,व सर्व पत्रकार संघटनेचे 40 पत्रकार उपस्थित होते..
या कार्यक्रमात समाजात सत्य, पारदर्शकता व लोकशाही मूल्ये जपण्यासाठी पत्रकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. प्राचार्य व व्यवस्थापन समितीच्या वतीने पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षण व पत्रकारिता यांचा समाजघडणीत असलेला महत्त्वपूर्ण सहभाग अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्तावनामध्ये शाळेचे सीईओ डॉक्टर मोहम्मद वखार मोसिन यांनी शाळेचे विविध उपक्रम विज्ञान प्रदर्शनी खेळाचे उपक्रम बद्दल शाळेची संपूर्ण माहिती दिली तसेच शाळेतर्फे विशेष करून मुलींसाठी नवीन जिम सुरू करण्यात आली याच निरीक्षण सर्व पत्रकारांनी केलं.
कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. पत्रकारांनीही आपल्या मनोगतातून शिक्षणसंस्थांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व पत्रकारांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

29
2698 views