logo

महात्मा ज्योतिबा फुले सब्जीच्या वतीने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व आ. डॉ. परिणय फुके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशन भंडाराच्या वतीने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय अंध विद्यालयात वृक्षारोपण, फळ वाटप व क्रीडा क्षेत्रात भारताचे व महाराष्ट्राचे नाव लौकिक करणारे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार आणि महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी परिसरात आरोग्य शिबीर व फळ वाटप तसेच विविध उपक्रम राबवून पालकमंत्री डॉ. भोयर व आ. फुकेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज, प्रगतशील शेतकरी विनोद आस्वले, सुरचंद राघोर्ते, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, शासकीय अंध विद्यालयाचे प्रकाश बागडे, उपाध्यक्ष क्रिष्णा उपरिकर, नगर सेवक शिवशंकर आजबले, शेखर बाईक, आसिफ भाई, सुरज गायधने, सुरज साखरकर, आकाश कटणकर, नागेश ताईतकर, जितेंद्र ढेंगे, लोकेश गाढवे, प्रमोद हजारे व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शासकीय अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ वाटप व विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्णपदक विजेती कु. प्राची चटप, महाराष्ट्र संघात फुटबॉल खेळामध्ये सुवर्णपदक विजेता सिद्धेश राघोर्ते, कयाकिंग व ड्राॅगन बोट क्रीडा क्षेत्रात अनेक पदके प्राप्त मोना बडवाईक, सामाजिक कार्यकर्त्यां वृक्षारोपण, पर्यावरण, स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुहानी फुलबांधे व मानसी खोत यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी कुशल नेतृत्व करणारे व सर्वांचे लाडके पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व आमदार डॉ. परिणय फुके यांच्या विकास कार्यावर भर दिला. तसेच विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार समीर नवाज यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विठ्ठल हटवार, रवि वाघाडे, विवेक आत्राम, अथर्व वानखेडे, सौम्य बावणथडे, अभय गहाणे, अथर्व तिडके, अतुल मेंढे, रवि बोरकर, ज्ञानेश्वर सोलंकी, निखिल केवट, विनोद सार्वे, सुरेश कटणकर, गोलू गाढवे, राहुल घडिले, अक्षय ईळपाचे, अनुराधा मेश्राम, पिंकी शेलारे, कांचन खोब्रागडे, धर्मेंद्र भोंडेकर व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव व शासकीय अंध विद्यालयातील विद्यार्थी -कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

5
438 views