logo

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिकशास्त्रे प्रशाळेत कार्यक्रम

जळगाव (दि. ०५) — कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या वतीने दि. ०३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना व्यवस्थापन परिषद सदस्या प्रा. डॉ. पवित्रा पाटील म्हणाल्या की, आधुनिक काळात महिला व मुली विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळवत आहेत, याचे श्रेय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. त्यांनी समाजातील भेदभाव, उच्च-नीचता व कर्मकांडाविरुद्ध बंड पुकारून सर्व समाजातील स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे युवक-युवतींनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन उच्च शिक्षणात प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जात-धर्मविहीन समाजरचनेचे फुले दाम्पत्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच्या पिढीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. उमेश गोगडिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे डॉ. विजय घोरपडे यांनी केले, तर आभार प्रा. योगेश माळी यांनी मानले.
कार्यक्रमास सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

9
230 views