
विषय :महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस मंजूर करण्याबाबत.
कायदेशीर मागणी महाराष्ट्र पोलिसांच्या हितासाठी.महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस मंजूर करण्याबाबत.
तक्रारीचा / निवेदनाचा तपशील :
मी खाली सही करणारा भारताचा जबाबदार नागरिक या नात्याने हे सविनय निवेदन सादर करीत आहे की, महाराष्ट्र राज्यातील पोलीस दल हे जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी स्वतःच्या सुख-दुःखाचा, आरोग्याचा व कुटुंबीयांसोबतच्या वेळेचा त्याग करून दिवस-रात्र २४ तास अखंड सेवा देत आहे.
पूर, दंगल, कायदा-सुव्यवस्था बंदोबस्त, धार्मिक व सामाजिक सण-उत्सव, यात्रा, जयंती-उत्सव, निवडणुका, भूकंप, वादळ, महामारी तसेच देशावर आलेली कोणतीही आपत्ती अथवा आणीबाणी अशा प्रत्येक प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दल नित्यनियमाने आपले कर्तव्य पार पाडत आहे.
मात्र, या सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही कुटुंब असते. अनेक वेळा सण-उत्सवाच्या काळातही त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवता येत नाही. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण आनंदाने साजरा करण्याचा समान हक्क त्यांनाही आहे.
भारतीय संविधानाच्या कलम 14 (समानतेचा हक्क), कलम 21 (सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क) व कलम 39 (सामाजिक व आर्थिक न्याय) यांच्या अनुषंगाने पाहता, इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांचे कार्य तितकेच महत्त्वाचे, जोखमीचे व समाजासाठी अत्यावश्यक आहे.
अशा परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मंजूर करणे हे केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या सेवेचा सन्मान, मानसिक आधार व प्रेरणा ठरेल तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सामाजिक-आर्थिक सुरक्षिततेस हातभार लावणारे ठरेल.
मागणी :
१.महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस मंजूर करण्यात यावा.
२.याबाबत तात्काळ शासन निर्णय (GR) निर्गमित करून निर्णय अंमलात आणावा.
३.पोलीस कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात यावे.
अर्जदाराची माहिती :
नाव : अमर मधुकर जोगदंड
पत्ता : भीम नगर, सिद्धटेक रोड, दौंड, जिल्हा पुणे
मोबाईल क्रमांक : 8888058805
ई-मेल:jogdand.amar1@gmail.com