logo

श्रद्धा, संस्कार आणि सहकार्याचा त्रिवेणी संगम जनता विद्यालयातील ‘उडान’ स्नेहसंमेलनाचा दिमाखदार समारोप

जनता विद्यालयात ‘उडान’ स्नेहसंमेलनाचा समारोप विविध उपक्रमांनी उत्साहात
पिंपळगाव सराई | दि. ४ जानेवारी २०२६
स्थानिक जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे दि. १ जानेवारीपासून सुरू असलेल्या ‘उडान’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोपीय कार्यक्रम आज विविध धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व भावनिक उपक्रमांनी संपन्न झाला. स्नेहसंमेलनाचे शेवटचे पुष्प चार भरगच्च कार्यक्रमांनी गुंफले गेले.

समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात वै. ह. भ. प. मामासाहेब दांडेकर कृतज्ञता स्मृती सोहळ्याने झाली. या सोहळ्यात पारायण व्यासपीठाचे नेतृत्व माधवराव पाटोळे यांनी केले. गणेश महाराज इंगळे यांनी गायनसाथ तर केशव महाराज ठाकरे यांनी मृदंगसाथ दिली. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ. श्रीनिधी राजे मंचावर उपस्थित होते. बाल किर्तनकार कृष्णा महाराज मोरे यांनी संत नामदेवांच्या ‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा…’ या अभंगावर आधारित भावपूर्ण किर्तन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे व आभार प्रदर्शन नितीन शेळके यांनी केले.

यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव कैलास शेटे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये सहाय्यक नियोजन अधिकारी अनिल शेवाळे यांच्यासह शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संतोषअप्पा खबूतरे,डॉ. श्रीनिधी राजे, गोपाल बोरा, म. वा. पातूरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश जाधव, आदर्श चे उपमुख्याध्यापक , भगवानआरसोडे विविध शाळांचे मुख्याध्यापक, सल्लागार समिती सदस्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात कैलास शेटे यांनी विद्यार्थ्यांना लहान यशातून मोठ्या ध्येयांकडे वाटचाल करण्याचा संदेश दिला. अनिल शेवाळे यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून प्रशासकीय सेवांसाठी आतापासूनच मानसिक तयारी करण्याचे आवाहन केले. प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी स्पर्धेपुरते न थांबता स्वतःला सिद्ध करण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम प्रभारी अविनाश असोलकर यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्नेहसंमेलन प्रमुख सतीश शेटे यांनी केले.

दुपारी १ ते २.३० या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित पंगतीत बसून भोजनाचा आनंद घेतला. स्नेहसंमेलनातील हा क्षण विद्यार्थ्यांसाठी विशेष भावनिक व आनंददायी ठरला.

दुपारी ३ ते ४.३० या वेळेत माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भूषण डागा होते. प्रमुख मार्गदर्शन सुहास जामदार यांनी केले, तर अमोल खेकाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य, सल्लागार समिती सदस्य मदन गवते,रा.स्वं.सं. चे धाड तालुका संघचालक सुभाष बारस्कर, सदाशिव शिंदे व मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघाची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले. सुहास जामदार यांनी शिक्षण प्रसारक मंडळाचा उद्देश मोफत व मूल्याधारित संस्कारक्षम शिक्षण देण्याचा असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात भूषण डागा यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आपलेच घर समजून सहकार्य करण्याचे आवाहन केले. शंकर तरमळे यांनी शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली, तर माजी मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांनी शाळा ही परस्पर सहकार्यानेच प्रगती करते, असे मत व्यक्त केले. सदर मेळाव्याचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघ प्रभारी देविदास दळवी यांनी केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी केले.

अशा प्रकारे धार्मिक श्रद्धा, शैक्षणिक प्रोत्साहन, सामाजिक बांधिलकी व भावनिक आपुलकी यांचा सुरेख संगम साधत ‘उडान’ स्नेहसंमेलनाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

94
1814 views
1 comment  
  • Ravindra Ramsing Khanande

    कृपया जास्तीत जास्त शेअर करा .👍