एमपीएससीची गट ब पदासाठी आज परीक्षा
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 'गट ब' पदासाठीची परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी आणि 'गट क'साठीची परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.४ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी २३ उपकेंद्रांसाठी रविवारी सकाळी ६ वाजता निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्याकेलेल्या उपस्थितीत केंद्रनिहाय नियुक्त अधिकाऱ्यांकडे प्रश्नपत्रिका सुपूर्द केल्या जाणार आहेत. त्यानंतर परीक्षा केंद्रावर उमेदवारांसमक्ष संच फोडल्यानंतरच परीक्षेला सुरुवात होणार आहे.