
शेखर शेजुळ व परिवाराच्या वतीने लग्न खर्चा मधून शाळेसाठी दिले दहा लाख रुपयाचे दान याआधीही शेजूळ परिवारांनी शाळेसाठी दिले लाख रुपयाचे दान
*आंबेगाव ता ता माजलगाव जि बीड येथील शेखर शेजुळ यांचा आदर्श विवाह लग्नाच्या खर्चामधून दिले शाळेला दिले दहा लाख रुपये चे दान*
(*महेंद्र कुमार महाजन रिसोड*) वाशीम
(9420352121)
मंदिरात लग्न करुन,10 लाखाची शाळेला दिली देणगी..!
गावच्या जि.प. शाळेला अद्यावत संगणक कक्ष बांधुन देण्याचा वधु वरांचा संकल्प.
परभणी येथील रहिवाशी असणारे शेखर उत्तरा माधव शेजुळ (B.Tech, MBA) या इंजि. तरुणाने..... आपल्या लग्नात कुठलाही बडेजाव पणा न दाखवता अगदी साध्या पद्धतीने दत्त मंदिरात (खरोळा ता. रेणापुर जि. लातुर) लग्न सोहळा आनंदोत्सवात पार पाडला...!
आबेगाव ता.माजलगाव जि. बीड येथील मुळ रहिवाशी असलेले व महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ. माधव देसाई शेजुळ हे परभणी येथील ज्ञानोपासक वरिष्ठ महाविद्यालयातुन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख या पदावरून (31/5/2025 रोजी) सेवानिवृत्त झाले आहेत. इंजि. शेखर शेजुळ हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.....
===============
सध्या शेखर हा पुणे येथे
तीन वर्षापासुन नौकरीस आहे... यापुर्वी सुध्दा नौकरीचा पहिला पगार शेखर ने आपल्या गावातील जि.प.शाळेच्या विकास कामाला दिला होता....
शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संजय राठोड गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली... समस्त गावकरी लोकसहभागातून जि प. शाळेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करित आहेत...! गावकर्यांनी निर्धारित/निश्चित केलेला ध्येयवादी महत्वकांक्षी प्रकल्प पुर्णत्वाकडे नेण्यासाठी या लोक चळवळीत आपला ही खारीचा वाटा/सहभाग असला पाहिजे... या हेतुने प्रा. डॉ. माधव देसाई शेजुळ यांनी (2019 ते 2025 पर्यंत) आपल्या स्वत:च्या उत्पन्नातून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकास कामाला (जमीन खरेदीसाठी व कंपाउंड वॉल बांधण्यासाठी) आतापर्यंत अंदाजे 15 लाख रुपये देणगी दिलेली आहे.
चि. शेखर शेजुळ चा शुभ विवाह बावी ता.वाशी जि. धाराशिव येथील माजी मुख्याध्यापक अक्रुरराव कृष्णाजी शिंदे यांची नात व सौ. रेखा व संतोष अक्रुरराव शिंदे यांची सुकन्या चि. सौ. का. ऋतुजा (MBA) हिच्यासोबत खरोळा येथील दत्त मंदिरात फक्त 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत हिंदु धर्मातील रुढी परंपरेनुसार अगदी साध्या पद्धतीने हर्षोल्लासात संपन्न झाला.
लग्न सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे कोणत्याही स्वरुपात वधु पक्षाकडुन हुंडा/सोने/चांदी घेतले नाही, कोणतेही संसार उपयोगी साहित्य नाही, आहेर भेटी नाही, आतिषबाजी, वाजंत्री/DJ, निमत्रंण पत्रिका, घोडा, प्री-वेडिंग फोटोग्राफी, मंडप, डेकोरेशन, बॅनरबाजी यासारख्या खर्चीकबाबी वर होणारा खर्च जाणीवपुर्वक टाळला.
यातुन बचत होणारी रक्कम गावातील जिल्हा परिषद शाळेला अर्पण/दान करण्याची ईच्छा शेजुळ कुटुंबातील विलास देसाई शेजुळ, प्रा. डॉ. माधव देसाई शेजुळ, सौ. उतरा माधव शेजुळ व चि. शेखर माधव शेजुळ यांनी शिंदे कुंटुबातील सदस्यासमोर व्यक्त केली होती
या विवाह सोहळयात सक्रिय सहभाग घेणारे मुलीचे मामा प्रा. प्रभाकर रामराव माने (कारेपुर ता. रेणापूर जि. लातुर ) व लहाने चुलते इंजि. अतुल अक्रूरराव शिंदे यांची सकारात्मक भुमिका या आगळया-वेगळया विवाह सोहळ्यासाठी निर्णायक व महत्वपूर्ण ठरली....! त्यांच्या सहकार्यामुळेच शेजुळ परिवाराने चार वर्षापुर्वीच निश्चित केलेला व अपेक्षीत असणारा नाविन्यपूर्ण असा विवाह सोहळा उत्साहात व आंनदीमय वातावरणात पार पडण्यास मदत झाली. या सहकार्य व समती दिल्याबदल वधु मंडळीचे (शिंदे परिवाराचे) शेजुळ परिवारातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
दोन्ही परिवाराने प्रत्येकी 5 - 5 लाख रुपये एकत्र जमा करायचे व एकुण 10 लाख रुपये इंजि.शेखर माधव शेजुळ यांचे मुळगाव आबेगाव ता.माजलगाव जि.बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक सरकारी शाळेला अर्पण/दान करायचे, असा निर्णय दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमताने घेतला आहे .
या 10,00000/- रु. देणगी मधुन शाळेतील विद्यार्थ्यासाठी अद्यावत असे संगणक कक्ष (संगणक हॉल) बांधुन देण्याचा निर्धार नवदांपत्यांनी केला आहे.
याकामी.... समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन्ही कुंटुब आपली महत्वकांक्षा पुर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत.