logo

जिल्हा पत्रकार दिनानिमित्त जळगावात भव्य पत्रकार मेळावा ६ जानेवारीला व्याख्यान, सर्वसाधारण सभा, आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन


जिल्हा पत्रकार दिनानिमित्त जळगावात भव्य पत्रकार मेळावा

६ जानेवारीला व्याख्यान, सर्वसाधारण सभा, आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात सुरू होणार असून, त्यापूर्वी सकाळी १०.३० वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. विजय बापू पाटील भूषविणार आहेत.
कार्यक्रमास महनीय वक्ते म्हणून
डॉ. सुधीर भटकर (निवृत्त प्राध्यापक, पत्रकारिता विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ)
श्री. संदीप बाबुराव घोरपडे (ज्येष्ठ समाजसेवक)
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ. रविंद्र ठाकुर (जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव) उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार दिनाच्या औचित्याने जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी पत्रकार बंधू-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान शिबीरही या दिवशी घेण्यात येणार आहे.
आरोग्य शिबिरासाठी डॉ. नितीन धांडे व डॉ. मुकुंद गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पत्रकार बांधवांनी आपली नावे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी श्री. अशोक भाटीया (मो. नं. ९४०४०५०३०८) यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया प्रतिनिधी तसेच तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


1
100 views