
काटोल येथे समता सैनिक दलाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न व मुख्य शाखा संघटक' पदी नियुक्ती....!
काटोल (प्रतिनिधी):
समता सैनिक दल, दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने संघटनेच्या विस्तारासाठी आणि सामाजिक कार्याला गती देण्यासाठी नागपूर जिल्हा ग्रामीण ता.काटोल येथील सरस्वती नगरस्थित नगरपरिषद शाळा क्रमांक ११ समोरील कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
हा कार्यक्रम समता सैनिक दलाचे मार्गदर्शक तथा मुख्य संयोजक आयु. घनश्यामजी फुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष विदेश्वर सी. गजबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून:
सुनीलजी नारनवरे (कमांडर)
दीपकजी ढोके (सचिव)
विकासजी सोमकुवर (शाखा संघटक)
लक्ष्मीबाई शेंडे (तालुकाध्यक्ष)
संध्या सहारे (तालुकाप्रमुख)
यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. श्री. भागवतजी पाटील यांची मुख्य शाखा संघटक पदाची महत्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली.
बैठकीचा उद्देश आणि नियुक्ती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विदेश्वर गजबे यांनी सांगितले की, "समता सैनिक दलाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. नवनियुक्त मुख्य शाखा संघटकांच्या माध्यमातून जिल्ह्यात संघटनेचे जाळे अधिक मजबूत होऊन 'गाव तिथे शाखा- घर तिथे सैनिक' असे संघटन तयार करून सामाजिक चळवळीला एक वेगळी दिशा देता येईल.
या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी काटोल तालुक्यातील व जिल्हा ग्रामीणमधील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.