logo

*राज्यपालांची अवनखेड ग्रामपंचायतीला भेट.*

*अवनखेड । वार्ताहर* :- दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भेट देवून गावाची पाहणी करुन विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव यांनी ग्रामस्थांच्या वतीने राज्यपाल देवव्रत यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. राज्यपाल देवव्रत यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन विकासकामांची माहिती घेतली. त्यांनी गावातील विकासकामे पाहून समाधान व्यक्त केले आणि ग्रामस्थांचे कौतुक केले. गावाची एकजूट असेल तर गावाचा विकास व्हायला वेळ लागत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यपालांच्या स्वागतासाठी गावात जागजागी रांगोळी फुलांची सजावट आणि भजनी मंडळ यांनी टाळ मृदंगच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी महिला, विद्यार्थी, ग्रामस्थ, शासकीय निम शासकीय कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

19
3308 views