logo

सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादनक्रांतिज्योती


सातारा, दि. ३ : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जन्मस्थळी, खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास भेट देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो नागरिक नायगाव येथे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नायगावनगरी आकर्षक सजावटीने, सडा-रांगोळीने सजवण्यात आली असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

15
320 views