logo

उत्तमचंद बगडिया महाविद्यालय, रिसोड येथे जयंती उत्साहात साजरी, सावित्रीबाई फुले ही एक विचारधारा – अँड.नूतन भराड

रिसोड : उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुलकर्णी होते, तर प्रमुख वक्त्या म्हणून ॲड. नूतन भराड यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे नियोजन विशाखा समिती प्रमुख प्रा. डॉ. खेडेकर यांनी केले. प्रस्ताविकात डॉ. खेडेकर यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनाचा, समाजकारणातील त्यांच्या भूमिकेचा आणि स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा विद्यार्थ्यांना सविस्तर परिचय करून दिला.
प्रमुख वक्त्या ॲड. नूतन भराड यांनी सावित्रीबाई फुले यांचे काव्य, सत्यशोधक समाजाचे कार्य, बालहत्या प्रतिबंधक गृह, स्त्रीशिक्षणाचा प्रसार तसेच बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी उभारलेले कार्य यावर सखोल मार्गदर्शन केले. “सावित्रीबाई फुले ही केवळ व्यक्ती नसून एक विचारधारा आहेत,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुलकर्णी म्हणाले की, “सावित्रीबाई फुले यांचे कार्य म्हणजे बहुजन समाजाच्या मुक्तीचा नवा मार्ग. त्यांच्या विचारांनी आज असंख्य स्त्रिया उच्च पदावर विराजमान होत असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. ए. जी. वानखेडे, प्रा. टिकार, प्रा. डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. डॉ. मेश्राम आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. काळे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. बोंडे मॅडम यांनी मानले.
प्रा. पाठक मॅडम, प्रा. डॉ. नरवाडे, प्रा. संदीप जुनघरे, प्रा. राम जुनघरे, प्रा. राऊत, प्रा. बाजड, प्रा. साबळे, प्रा. सुमित लाव्हरे, प्रा. वाघ, प्रा. पांढरे, श्री. ओकार पूरी, गोपाल कोल्हे, संतोष घुगे, सूरज नरवाडे तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
सांस्कृतिक सादरीकरणात सोनाली अंभोरे हिने गीत सादर केले. त्यानंतर वैष्णवी घोडे, कैलास जाधव, मेघा इंगळे, पूजा मोरे, अभिषेक यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी “सावित्रीबाई फुले – एक विचारधारा” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक : वैशाली पाईकराव
द्वितीय क्रमांक : हर्षदा देशमुख
तृतीय क्रमांक : पूजा मोरे
महाविद्यालयात प्रेरणादायी वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

23
2478 views