logo

बीडच्या बालापीर भागात संशयावरून तिघांना पकडले; बालचोरीच्या अफवेमुळे नागरिकांकडून मारहाण

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालापीर भागात आज खळबळजनक घटना घडली. परिसरात फिरत असलेल्या तीन संशयित व्यक्तींना स्थानिक नागरिकांनी पकडले. या तिघांवर बालचोरीच्या उद्देशाने परिसरात आल्याचा संशय व्यक्त केला जात होता. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या संशयितांकडे कोणतेही वैध ओळखपत्र, जसे की आधार कार्ड, आढळून आले नाही. तसेच ते तिघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली. संतप्त नागरिकांनी संशयितांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून मी स्वतः घटनास्थळी उपस्थित होतो आणि हस्तक्षेप करत तिन्ही संशयितांना शिवाजीनगर पोलिस चौकीत सुरक्षितपणे जमा केले.
पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सध्या बालचोरीबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास न ठेवता कायदा हातात घेऊ नये व संशयास्पद प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
या घटनेमुळे काही काळ बालापीर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
ग्राउंड रिपोर्ट: शेख गालिब
स्थळ: महाराष्ट्र | बीड | बालापीर

933
34513 views