
*गोदावरी खोऱ्यात पाणीसाठ्यांवरील बंदी हटवा*. *राज्यपालांकडे जलपरिषद सदस्य नगरसेवक नितीन गांगुर्डे यांची मागणी*
दिंडोरी l प्रतिनिधी:- मराठवाड्यातील जायकवाडी धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा साठत असल्याने आदिवासी जनतेचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गोदावरी खोऱ्यात असलेली पाणीसाठ्यावरील बंदी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उठवावी अशी मागणी दिंडोरी नगरपंचायत चे नगरसेवक तथा जल परिषदेचे सदस्य नितीन गांगुर्डे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे . महाराष्ट्राचे राज्यपाल हे दोन दिवसीय दिंडोरी तालुका दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नितीन गांगुर्डे यांनी ही मागणी केली आहे.
याबाबत दिंडोरी नगरपंचायत चे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी निवेदनात म्हटले आहे की जायकवाडी धरणाची पाण्याचे तूट भरून काढण्यासाठी पूर्व भागात गोदावरी खोऱ्यात पाणीसाठे करण्यास बंदी आहे. नदीला साधा बांध सुद्धा घातल्या जात नाही .परंतु यामुळे दिंडोरी पेठ सुरगाणा कळवण आदिवासी भागातील जनतेवर अन्याय होत आहे .त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाला सुद्धा पुरेसे पाणी मिळू शकत नाही. आदिवासी भागाचे पाणी हे पश्चिम वाहिनी नारपार खोऱ्यांद्वारे दमण गंगा अरबी समुद्राला जाऊन मिळते .हे पाणी अडवले तर आदिवासी भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेत .परंतु शेतीसाठी सुद्धा मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे .दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वळण योजना कार्यान्वित झाल्या. या वळण योजनाद्वारे चांगले पाणी ओझरखेड ,पुणे गाव, वाघाड, पालखेड , करंजवन धरण आदी धरणांमध्ये साचले .परंतु अजूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता होऊ शकते. दिंडोरी तालुक्यातील पावसाच्या पाण्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजमाप होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने खास करून उपाययोजना करून दिंडोरी पेठ च्या सुरगाणाच्या पावसाचे मोजमाप करावे. गेल्या काही वर्षांपासून गोदावरी खोऱ्यात चांगला पाऊस पडत असल्याने जायकवाडी धरणाला पाणी मिळत आहे .यंदाही जायकवाडी धरण चांगले क्षमतेने भरलेली आहे. शासन मराठवाडा परिसरातील दुष्काळ उठवण्यासाठी नवीन नवीन उपाययोजना करून नदीजोड प्रकल्प राबवत आहे. गोदावरी खोऱ्यातून पूर्व भागाला चांगले पाणी मिळते. परंतु स्थानिक ठिकाणी मात्र आदिवासी पाण्यापासून वंचित राहत आहे .आदिवासी भागात पाणीसाठे होणे गरजेचे आहे .परंतु राज्यपालांच्या आदेशान्वये हे पाणी साठे साठी करण्यास बंदी आहे. महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल हे दिंडोरी दौऱ्यावर येत आहे .त्यांनी या दौऱ्यात दिंडोरी पेठ सुरगाणा परिसरातील पाण्याचा सुद्धा आढावा घ्यावा .येथील आदिवासी जनतेचे उन्हाळ्यात पाण्यासाठी चाललेले हाल पहावे.चार महिने पूर्ण पाऊस असतो परंतु डिसेंबर जानेवारीनंतर आदिवासी भागात पाणी कमी पडते .आणि आदिवासी भागातील जनतेचे रोजगारासाठी पूर्व भागात स्थलांतर सुरू होते .हे स्थलांतर रोखण्यासाठी महामहीम राज्यपालांनी गोदावरी खोऱ्यात पाणीसाठे वाढवण्यास परवानगी द्यावी , तसे आदेश राज्य शासनास काढावे अशी मागणी दिंडोरी नगरपंचायतचे नगरसेवक तथा जल परिषदेचे सदस्य नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.