मणियार बंधूंच्या शस्त्र परवान्यांचे एन्काउंटर....
जिल्हाधिकाऱ्यांनी केले 'लायसन्स' रद्दजळगाव : सार्वजनिक कार्यक्रमातरिव्हॉल्व्हरसह नृत्य केल्याच्या आरोपानंतर आयुष व पीयूष मणियार बंधूंचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सुनावणीअंती मणियार बंधूंचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे 'शो'बाजी केल्याच्या आरोपात अडकलेल्या मणियार बंधूंना मोठी चपराक बसली आहे.जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक पाटील तसेच आयुष मणियार व पीयूष मणियार या दोघा भावांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनीजिल्हाधिकाऱ्यांकडे झाली सुनावणीमणियार बंधूंच्या शस्त्र परवान्यांसंदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुनावणी झाली. नृत्य करताना पीयूषकडे रिव्हॉल्व्हर नव्हते, असा दावाही करण्यात आला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी मणियार बंधूंच्या शस्त्र परवान्यांसंदर्भात सादर करण्यात आलेल्या अहवालाचा आधार घेतला आणि दोन्ही शस्त्र परवाने रद्द केले आहेत.तत्काळ कारवाई करत पोलिस निरीक्षक पाटील यांना निलंबित केले होते. तशातच एका संगीत कार्यक्रमात पीयूष मणियार याने कमरेला पिस्तूल लटकावत नाचून नोटा उधळल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी रिव्हॉल्व्हरसह केलेल्या 'शो'बाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मणियार बंधूंचा शस्त्र परवाना रद्द करण्याची मागणी पुढे आली होती.