logo

प्रलंबित कर्ज योजनेतील २५८ अर्जदारांनी तात्काळ संपर्क साधा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे आवाहन.....



अहिल्यानगर, दि. २ - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या सफाई कर्मचारी (NSKFDC) योजनेंतर्गत आलेल्या २५८ कर्ज प्रस्तावांची पुढील कार्यवाही प्रलंबित आहे. संबंधित अर्जदारांनी येत्या सात दिवसांत मूळ कागदपत्रांसह कार्यालयाशी संपर्क साधावा, अन्यथा हे प्रस्ताव रद्द होऊ शकतात, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

महामंडळाकडे सन २०२३ मध्ये या योजनेंतर्गत २५८ अर्जदारांनी ऑनलाईन प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, अद्याप या प्रस्तावांसोबत आवश्यक ती मूळ कागदपत्रे सादर झालेली नाहीत. त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

अर्जदारांनी विहित मुदतीत महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रे जमा करावीत, जेणेकरून त्यांचे कर्ज प्रस्ताव मार्गी लावता येतील. संपर्क न केल्यास कर्जाची आवश्यकता नाही असे समजून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही‌ महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

​#अहिल्यानगर #महात्माफुलेमहामंडळ #कर्जयोजना #सफाईकर्मचारी #NSKFDC #सरकारीयोजना #अर्जदार #अहमदनगर #महत्त्वाचीसूचना #विकासमहामंडळ #महाराष्ट्रशासन #SocialJustice #GovernmentScheme #LoanAlert

14
1449 views