
श्री . नरसिंगराव पळनाटे सरांचा अम्रत महोत्सव - अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी आयोजित .
पळनाटे सरांचा 75 वा अम्रत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी आयोजित . शिरूर ताजबंद - अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे श्री . नरसिंगराव बापुराव पळनाटे सरांचा 75 वा अभिष्टचिंतन सोहळा येथील अंजली मंगल कार्यालय उदगीर रोड येथे शनिवारी दुपारी 12: वाजता आयोजित केल्याची माहीती संत गोरोबाकाका मजूर सहकारी संस्था सय्यदपूरचे चेअरमन ज्ञानोबा पारसेकर यांनी दिली . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव असून प्रमुख अतिथी म्हणुन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत . प्रमुख उपस्थिती मध्ये माजी सरपंच साहेबराव जाधव, कृउबा सभापती मंचकराव पाटील, उदगीर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष कल्याणराव पाटील, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस शिवानंद हेंगणे, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृती कांबळे, सरपंच मचिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरजभैय्या बाबासाहेब पाटील, व्यापारी तथा माजी चेअरमन बाबुराव उडतेरावार आदी उपस्थित राहणार आहेत . यावेळी कुंभार समाजातील गुणवंत गुणवंताचा सत्कार करण्यात येणार आहे . कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन गोपाळ पळनाटे, अनिल पळनाटे, आनंद पळनाटे, किशोर पळनाटे, संदिप पळनाटे, आका श पळनाटे,विक्रम पळनाटे, विजय पळनाटे आदींनी केले आहे .