logo

ने.सु.बो चा पंकज झाडे यांनी लष्करातील पॅरा ट्रूपर चे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार

नांदेड, दि. २ ः
नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयाचा एन.सी.सी. छात्र व किनवट येथील सौ. अंजना विश्वनाथराव झाडे यांचे सुपुत्र सार्जंट पंकज विश्वनाथराव झाडे यांनी भारतीय सैन्य दलातील अत्यंत खडतर असे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्य दलामध्ये अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पॅरा कमांडो किंवा पॅरा ट्रूपर म्हणून देशाची रक्षा करत आहेत. पंकज झाडे हे एका शेतकरी कष्टकरी कुटुंबातून असून त्यांनी या यशाला गवसणी घातली आहे. पंकज झाडे यांनी सहा महिन्याची बेंगलोर येथे पॅराची अतिशय अवघड अशी प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात दाखल झाले आहेत. काही दिवस सुट्टी व्यतित केल्यानंतर ते आपल्या कर्तव्यावर हजर होणार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हे महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, किनवट येथे झाले. त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे एन.सी.सी अधिकारी लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.बालासाहेब पांडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन पंकज झाडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बालासाहेब पांडे म्हणाले की, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र दरवर्षी सातत्याने भारतीय सैनिक दाखल होत आहेत व ते सेवेसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच यावेळी एन सी.सी अधिकारी तथा संख्याशास्त्र विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.किशोर इंगळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारत देश हा तरुणांचा देश आहे त्यामुळे देशाला राष्ट्रप्रेम राष्ट्रहित जोपासणारे तरुणांची गरज आहे. एन.सी.सीच्या विद्यार्थ्यांनी पंकज झाडे यांच्यासारखे आदर्श समोर ठेवून राष्ट्रहित व राष्ट्रप्रेम जोपासावे. तसेच सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करावे असे आवाहन केले.

या सत्काराला नांदेड चे प्रतिष्ठित नागरिक श्री बाळू जाधव, प्रभारी प्राचार्य डॉ.सुग्रीव फड, उपप्रचार्य सौ.कल्पना कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या निवडीबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष कैलासचंद काला, सचिवा ॲड सौ.वनिता ताई जोशी व अन्य मान्यवरांनी पंकज झाडे यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व राष्ट्रीय छात्र सैनिक तसेच इतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

1
0 views