logo

लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता प्रवाशांना UTS वरून काढता येणार नाही पास; 'या' अ‍ॅपचा करा वापर

हजारो प्रवाशी मुंबईच्या लोकलने प्रवास करतात. रोजचा प्रवास करणारे रोज तिकीट काढण्यापेक्षा पास काढतात. आता डिजिटलायजेशन झाल्यापासून हा पास तिकिटाच्या खिडकीवरून काढण्यापेक्षा आता अ‍ॅप वरच काढला जातो. हे  सोप्प पडतं. यासाठी साहजिकच UTS नाव अ‍ॅप वापरलं जातं. पंरतु भारतीय रेल्वेने UTS (Unreserved Ticketing System) अ‍ॅपवरील मासिक पास बुकिंगची सुविधा बंद केली असून, आता प्रवाशांना पाससाठी नवीन RailOne अ‍ॅपचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ज्यांचा पास आहे त्याचं काय?

आतापर्यंत ज्यांचे मासिक पास वैध आहेत, असे प्रवासी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना UTS अ‍ॅपवरच आपला पास दाखवू शकतात. मात्र, UTS अ‍ॅपवरून नवीन मासिक पास बुक करण्याचा पर्याय कायमस्वरूपी हटवण्यात आला आहे. सध्या UTS अ‍ॅप उघडल्यावर पास बुकिंगसाठी RailOne अ‍ॅप वापरण्याचा संदेश दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, अनारक्षित तिकीट बुकिंगची सुविधा मात्र UTS अ‍ॅपवर सुरूच राहणार आहे.

RailOne अ‍ॅपवर तिकीट घेतल्यास सूट

डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने RailOne अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट खरेदीवर 3 टक्के सूट जाहीर केली आहे. ही सवलत 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच इतर कोणत्याही डिजिटल पेमेंट पद्धतीने पैसे भरल्यास प्रवाशांना थेट सूट मिळणार आहे.

याआधी RailOne अ‍ॅपवरील R-वॉलेटद्वारे पेमेंट केल्यासच 3 टक्के कॅशबॅक मिळत होता. मात्र, आता नव्या निर्णयानुसार सर्व डिजिटल पेमेंट पर्यायांवर थेट सवलत देण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 30 डिसेंबर रोजी CRIS (Centre for Railway Information Systems) ला पत्र पाठवून आवश्यक सॉफ्टवेअर बदल तात्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

RailOne अ‍ॅपवरून पास कसा बुक कराल?

RailOne अ‍ॅप Play Store आणि App Store दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक रेल्वे सेवा मिळतात, ज्यामध्ये मासिक पास बुकिंग, आरक्षित व अनारक्षित तिकीट, रिफंड, जेवण ऑर्डर, ट्रेन शोध आणि PNR स्टेटस तपासणी यांचा समावेश आहे.

UTS अ‍ॅप उघडल्यावर प्रवाशांना RailOne अ‍ॅप डाउनलोड करण्याचा संदेश दिसेल.
त्या लिंकवर क्लिक करून RailOne अ‍ॅप डाउनलोड करा.
आवश्यक वैयक्तिक व ओळख संबंधित माहिती भरा.
लॉग-इन केल्यानंतर मासिक पास बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करा.

याशिवाय, प्रवासी रेल्वे स्थानकांवरील Passenger Reservation System (PRS) काउंटरवरूनही मासिक पास काढू शकतात.
www.merabharatsamachar.com

0
0 views