तलाठीआप्पांच्या बोट दाखवा मोहिमेला बसणार फुलस्टॉप
आठवड्यातून एक दिवस मंडळाधिकारी कार्यालयातजळगाव : तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामपातळीवरील नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण होतील, तसेच शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवता येतील, यासाठी महसूल विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नवीन वर्षापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या कामांसाठी टाळाटाळ केल्यास मंडळाधिकारी कार्यालयात संबंधित तलाठी तोंडघशी पडण्याची शक्यता आहे.बहुतांश ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शहरी भागातून कामकाज हाताळतात. यापूर्वी ग्रामस्थांना तालुका पातळीवर येऊन तलाठ्यांना भेटावे लागायचे. त्यानंतर शहरात येऊन पाठपुरावा करावा लागायचा.तहसीलदारांवर जबाबदारीतहसीलदारांनी आखलेल्या वेळापत्रकानुसार तलाठी आठवड्यातील चार दिवस कार्यालयात उपस्थित राहतील. तसेच एक दिवस मंडळ कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करतील.मंडळ मुख्यालयाच्या गावाचा बाजार दिवस त्यासाठी निश्चित केला जाणार आहे. तसेच नागरिक आणि लोकप्रतिनिर्धीच्या मागणी आणि सूचनेनुसार तलाठ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीचे दिवस वाढवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आता तलाठ्यांना कार्यालयात उपस्थिती देण्यासंदर्भात नुकताच आढावा घेतला आहे. त्यासाठी तहसीलदारांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.