logo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जावेद पठाण यांचं आकस्मिक दुःखद निधन

मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जावेद पठाण यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. जनसेवेचं ध्येय मनी बाळगणाऱ्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सदस्याचं असं निघून जाणं मनाला चटका लावून जाणारी बाब आहे. मात्र काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. मी जावेद पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

5
744 views