सर्वाधिक थकबाकी असणारी गावे महावितरणच्या रडारवर
नांदेड, दि. ३१ :- महावितरणच्या नांदेड परिमंडलातील नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्हयात वीजबिलांच्या थकबाकीने प्रशासन हतबल झाले आहे. सातत्याने वाढत जाणाऱ्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने शहरी भागांसह ग्रामीण भागातील सर्वाधिक थकबाकी असणारी गावे लक्ष्य केली आहेत. चालू महिन्याची वीजबिले आणि थकबाकी वसुलीसह वीजचोरांवर कारवाई करण्यासह आकडेबहाद्दर वीजवापरकर्त्यांविरुध्दही भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार धडक कारवाई करण्यात येत आहे.
तिनही जिल्हयात वीजबिल वसुलीसाठी सुक्ष्मनियोजन करण्यात आले असून त्यानुसार सर्वाधिक थकबाकी असणाऱ्या गावात ग्रामपंचायतीबाहेर थकबाकीदारांची नावे जाहीर करणे, वीजबिल थकबाकीच्या संदर्भांने लोकप्रतिनिधींना अवगत करणेसह प्रत्येक विद्युत वाहिनीवरील सर्व गावे रोहित्रनिहाय लक्ष्य करुन व्यक्तीगतरित्या ग्राहकांकडून वसुली करण्याच्या सक्त सुचना महावितरण प्रशासनाने दिलेल्या आहेत.
परिमंडलात सार्वजनिक दिवाबत्ती, पाणीपुरवठा व कृषी वर्गवारीतील ग्राहक वगळून घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडे सुमारे ७५८ कोटी रुपयांची थकबाकी थकलेली आहे. नोव्हेंबर २०२५ च्या तपशीलानुसार सर्वाधिक थकबाकी असणाऱ्या गावापुढील ग्राहकसंख्या आणि कंसातील आकडेवारी ही थकबाकीच्या रक्कमेची आहे. देगलूर विभागात भालगाव-१४६५९ ग्राहक (३.९१ कोटी),मुक्रमाबाद-१४७४ (३१ लाख), मरखेल-१२६२ (१७.६३ लाख), हनेगाव-१२५५ (२३.२४लाख), धर्माबाद-९६१५ (१.७१कोटी), चेनापूर-३१११ (६२.०३लाख), मुखेड-७१०४ (१.४६ कोटी),बाऱ्हाळी-१२५१ (२७.९२ लाख),जांब-११८८ (२२.१६ लाख), नायगाव- ५०६७ (१.५६ कोटी), नर्शी-२३५७ (१.३० कोटी), कंधार-५५७९ (६८.३२ लाख), पेठवडज-१२६६ (२३.४५ लाख), लोहा- ८८८४ (१.७२ कोटी), लिंबोटी-१२३६ (३६.६२ लाख), मुदखेड- ४२९२ (१.३३ कोटी), बारड- १९८६ (५१.४६लाख), अर्धापूर - ५३८० (७४.२५ लाख), मालेगाव ता. नांदेड- १४१३ (१४.७२लाख), लहान-९४१ (१५.३३ लाख), भांबरवाडी ता गंगाखेड- १०६४३ (७.३९ कोटी), राणीसावरगाव – ११७८ (९५.९६ लाख), अंजनवाडी ता. पालम – २५६२ (3.५० कोटी), तांदुळवाडी ८३७ (१.२१ कोटी), करडगाव ता.परभणी १६२५ (२.२८ कोटी), झरी- ११८७ (५.२४ कोटी), पोखर्णी (५.२५ कोटी), दैठना – १०१२ (३.४९ कोटी), टाकळी -९२२ (४.४८ कोटी), पुर्णा – ४७८८ ( ५.९५ कोटी), ताडकळस – १२१३ (४.४कोटी), जिंतूर – ९०२६ ( १८.५७ कोटी), बोरी – २२२१ (५.५९ कोटी), चारठाणा – १०११ ( ४.२ कोटी) मानवत- ७२२६ (४.१५ कोटी), पाथ्री – ५८३० (९.२५ कोटी), सेलू – ११९२२ (१०.३२ कोटी), कन्हेरवाडी १८३१ (९.७९ कोटी), सोनपेठ -२८४३ (१.७५ कोटी), शेळगाव १०८४ (४.८२ कोटी) अदी असंख्य गावांतून महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी थकलेली आहे. थकबाकी वसुलीसाठी पुढील काळातही सातत्याने कारवाई सुरु राहणार आहे.