logo

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्काराने गुरु-शिष्याचा गौरव; सतिश वडणगेकर व पुजा पवार सन्मानित

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्काराने गुरु-शिष्याचा गौरव; सतिश वडणगेकर व पुजा पवार सन्मानित
बेळगाव : चंदगड येथील कै. रवळनाथ पवार फाउंडेशन आणि ह्युमन राईट प्रेस पब्लिकेशन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कृतज्ञता सन्मान पुरस्कार' सोहळ्यात गुरु-शिष्यांच्या जोडीने घवघवीत यश संपादन केले आहे. मार्शल आर्ट क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल मा. सतिश महादेव वडणगेकर यांना 'इंटरनॅशनल अचिव्हर्स स्टार अवॉर्ड', तर त्यांची शिष्या पुजा रविंद्र पवार हिला 'भारत गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा दिमाखदार सोहळा रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर (रित्ज टॉकीज) येथे संपन्न झाला.
सतिश वडणगेकर यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान
सतिश वडणगेकर यांनी मार्शल आर्ट क्रीडा क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक काळ योगदान दिले आहे. विशेषतः महिलांसाठी त्यांनी राबवलेल्या सेल्फ डिफेन्स (आत्मसंरक्षण) कार्यशाळा, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना 'इंटरनॅशनल अचिव्हर्स स्टार अवॉर्ड' प्रदान करण्यात आला.
पुजा पवार हिला भारत गौरव पुरस्कार
वडणगेकर यांच्या शिष्या पुजा पवार हिलादेखील राष्ट्रीय स्तरावरील 'भारत गौरव' पुरस्काराने गौरवण्यात आले. मार्शल आर्टमधील नैपुण्यासोबतच गेली १० वर्षे ती योगासन, आहार-विहार, पर्यावरण आणि महिलांच्या आरोग्याविषयी सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत आहे. तिच्या या अष्टपैलू कार्याचा सन्मान या सोहळ्यात मा. सानिका बनारसवाले - जोशी सुप्रसिद्ध अभिनेत्री,मा. मंगेश पवार साहेब महापौर-बेळगाव, कर्नाटक,मा. प्रल्हादना हिरामणी साहेब उपजिल्हाधिकारी (म. रा. पर्यटन विकास महामंडळ, मुंबई,प्रा. डॉ. बी. एन. खरात संचालक, ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन,मा. दिपक पवार सचिव, कै. रवळनाथ पवार फाउंडेशन,चंदगड यांच्या हस्ते करण्यात आला.
या दोघांच्याही यशात त्यांच्या कुटुंबासह प्रशिक्षक अविनाश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

7
673 views