logo

पिस्तूलचा धाक दाखवून युवतीला पळवून नेले


पाचोरा येथील पाच जणांविरुध्द गुन्हा

नंदुरबार : पिस्तूलचा धाक दाखवून पाच जणांनी १९ वर्षीय युवतीचे अपहरण करून तिच्या काकूचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात पाचोरा येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हर्षल विनोद पाटील. (रा. मोहाडी, ता. पाचोरा) व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबारातील एका १९ वर्षीय युवतीला पळवून नेण्यासाठी हर्षल पाटील व इतर जण आले. हर्षल हा थेट युवतीच्या घरात घुसला. त्याने युवतीच्या काकूशी वाद घातला. तिच्या कंबरेला पिस्तूल लावत धमकावले आणि विनयभंग देखील केला. पिस्तूलचा धाक दाखवून युवतीलाही हात धरून फरफटत नेत घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवर बसविले व काही अंतरावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात (क्रमांक एमएच १९ सीझेड ७४६१) बसवून पळवून नेले. याबाबत युवतीच्या काकूच्या फिर्यादीवरून हर्षल पाटील याच्याविरुद्ध शहर पोलिसात युवतीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

2
58 views