logo

स्वार्थ, सत्ता, पैसा, भ्रष्टाचार आणि मनगट शाही वर चालते ग्रामपंचायत!

रामदास नामदेव ढोरमले
वार्ताहार मौजे जातेगाव, पारनेर जि. अहिल्यानगर

सत्तेचा माज, स्वार्थ, पैसा आणि मनगट शाही समाजाला काय आदर्श देईल?

जागे व्हा! सावध व्हा!
नमस्कार जातेगांवकर बंधु आणि ग्रामस्थ सज्जन हो!
मी रामदास ढोरमले वय वर्ष ६३ आपल्याच गावातील एक रहिवाशी आहे गेल्या दोन दिवसापूर्वी घडलेली घटना आपणा पुढे मांडत आहे. आपल्या गावात शांततेच वातावरण रहावे सत्याच्या व तत्वाच्या मार्गाने व भ्रष्टाचारमुक्त आणि समाजसेवा युक्त गावचे राजकारण असावं अशी प्रांजळ अपेक्षा करत व आपले कर्तव्य म्हणून मी दि. २४ डिसेंबर २०२५ ला ग्रामपंचायत कार्यालयात घरपट्टी भरण्यासाठी गेलो होतो. तेथे असलेले ग्रामशिपाई श्री अनिल मारुती ढोरमले यांच्याशी घडलेला किस्सा येथे सांगतो आहे. त्याने मला विचारले की कोण-कोणत्या घराची घरपट्टी भरायची अर्थात च मी विचारले कुठची घरं आहेत की मी पट्टी भरणे किंवा देणे लागतो. तर त्याने मला सांगितले तुमचे तुमच्या बंधुचे नावावर असलेले वगैरे उत्कंठेपोटी मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याने आमच्या मृत वडिलांच्या नावे असलेले व सध्या पडक्या स्वरूपात असलेल्या घराचाही उल्लेख करत ते आमचे बंधु सुभाष ढोरमले यांचे नावावर दाखविले अर्थात मला घर त्याचे नावावर असणे तितके महत्वाचे वाटत नव्हते पण ते फक्त एकट्याच्या नावावर कसे असू शकते कारण आमच्या वडिलांच्या मालमतेत आणखी आम्ही पण दोघ वारसदार आहोत ना! मग आमच्या ना हरकती शिवाय ती मालमत्ता फक्त एकाच्याच नावे कशी करता येऊ शकते हा सरळ सरळ प्रश्न मी ग्रामशिपाई श्री अनिल ढोरमले यांना विचारला, हे असे ही आपल्या ग्रामपंचायत मध्ये होऊ शकते का? तर त्याने अगदी प्रामाणिक पणे सांगितले हा अधिकार माझा नाही तर ग्रामसेवक आणि सरपंच यांनी जशी नोंद केली असेल तशी मी फक्त घरपट्टी घेतो. अर्थात ते करून घेणारे पण ग्रामसदस्य आहेत त्यांना हे सर्व माहित असेलच. मी पण जास्त न बोलता फक्त माझ्या घराची घरपट्टी रीतसर भरून पावती घेतली आणि कार्यालयातून निघून गेलो. व विचार केला की अजून किती जणांना असे फसविले गेले असेल, (आपण तर नोकरीं निमित्त पोटापाण्यासाठी बाहेरगावी असतो. प्रत्येक जण गावातील अशा कारभारावर लक्षही ठेवू शकत नाही. आणि परिणामी असे गैर कृत्य करणारी जमात निर्माण होते) नंतर दोन दिवसानंतर आमचे बंधु श्री सुभाष ढोरमले कार्यालयात गेल्यावर ग्रामशिपाई श्री अनिल ढोरमले यांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला त्यानंतर ते सरळ सरळ मला विचारू लागले तुला काय प्रॉब्लेम आहे? अर्थात मी त्यांना सांगण्याचा प्रयत्नही केला मला तुला घर देण्याविषयीं प्रॉब्लेम नाही पण असे आपल्या ग्रामपंचायत मध्ये असा अनागोंदी कारभार चालत असेल तर असे कित्येक कुटुंबामध्ये वाद निर्माण होतील. म्हणून मी हे प्रकरण काय आहे हे कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी केलेल्या काळ्याकर्माचे समर्थन करत मला उलट सुलट उत्तरे देऊ लागला परिणामी आमच्यात काही बाचाबाची ही झाली अनेक काहीं गैरसमज करून त्याने पण माझेवर अनेक आरोपही केले परिणामी मी पण रागानं काही अपशब्द किंवा ही कायदा असला म्हणून काही लूटमार करायची का? असा लूटमारीचा आरोप त्यांचेवर केला पण पैशाचा, सत्तेचा आणि मनगटाच्या जोरावर शिवीगाळ करत त्याने माझ्या अंगावर हात टाकला इतकेच नाही तर माझी बायको मध्ये आली तर तिलाही अर्वांच्य शब्दात बोलून मारण्याचा प्रयत्न केला व मला जीवे मारण्याची धमकीही देत खूप लाथा बुक्क्याने मारहाण केली. ही सर्व घटना घडत असताना माझी आई मध्ये आली व अनावर होऊन आक्रोश करू लागली ती सर्व घटनेची साक्षीदारच होती, त्याची बायको व सुनबाई हे पण तितकेच त्याचे समर्थन करत होतेच, इतकेच कमी की काय लगेच त्याचा मुलाला श्री सुजित ढोरमले यांना ही फोन करून आम्हाला मारण्यासाठी बोलावून घेतले आणि आणखी काही विपरीत होण्या अगोदर व आईची अवस्था पाहुन मीच माघार घेऊन प्रकरण संपवले. तर मित्रांनो अशी सत्तेचा पैशाचा व मनगट शाही जर आपल्या गावात येत असेल तर आपणच सावध राहिले पाहिजे. नाहीतर आपलेच सख्खे आपणास स्वार्थासाठी फसवतील.आपण आपल्या घरात आणि गावात आपली सुरक्षितता टिकवू शकणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था संपून गुंडशाही निर्माण होईल म्हणून अशा प्रवृत्तीला आवर घातला पाहिजे असे माझे सर्व ग्रामस्थ आणि नागरिक यांना आवाहन आहे कृपया जागे व्हा! सावध व्हा! सत्य आणि तत्वाच्या बाजूने राहून विचार करा!
धन्यवाद!
(ह्या स्वार्थी, सत्तेचा, पैशाचा आणि गुंडशाही प्रवृत्ती मुळे आज आमच्या कुटुंबात प्रेमाचा नात्याचा शेवट होऊन एक न संपणारा दुरावा निर्माण झाला आहे. त्याची खंत आहे)

3
736 views