logo

थेंबे थेंबे तळे साचे चिमुकल्यांच्या बचतीतून ग्रंथालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर

📚 थेंबे थेंबे तळे साचे!
चिमुकल्यांच्या बचतीतून ग्रंथालय समृद्ध ✨

“थेंबे थेंबे तळे साचे” या म्हणीचा प्रत्यय देणारा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेवरे येथे यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. दि. 12 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालय बचत बँक या अभिनव उपक्रमातून दि. 08 डिसेंबर 2025 अखेर तब्बल ₹ 24,500/- इतकी रक्कम जमा झाली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, बचतीची सवय आणि ज्ञानाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या उपक्रमातून जमा झालेल्या रकमेचा उपयोग करून पुणे पुस्तक महोत्सव येथून विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व ज्ञानवर्धक पुस्तके खरेदी करण्यात आली.
या उपक्रमामुळे शाळेचे ग्रंथालय अधिक समृद्ध झाले असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे. नेवरेच्या शाळेचा हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
#थेंबेथेंबेतळेसाचे
#ग्रंथालयबचतबँक
#वाचनसंस्कृती
#पुस्तकप्रेम
#ZPशाळा
#नेवरेशाळा
#पुणेपुस्तकमहोत्सव

12
517 views