
बीड: पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील OPEN SPACE वर अतिक्रमण! LIVE REPORTING मधून मोठा खुलासा, नगरपालिकेच्या जागेवर खासगी दवाखान्याची PARKING
बीड | LIVE REPORTING: SHAIKH GALIB
बीड शहरात कायदा व प्रशासनाच्या नाकाखाली गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बीड शहर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील सार्वजनिक वापरासाठी असलेली OPEN SPACE (मोकळी जागा) बळकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार LIVE REPORTING दरम्यान समोर आला आहे.
LIVE REPORTING करत असताना प्रतिनिधी SHAIKH GALIB यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, एका नामांकित खासगी डॉक्टरने मजबूत तार-कंपाउंड तोडून नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. या जागेचा वापर थेट खासगी दवाखान्याच्या PARKING साठी सुरू असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे हे अतिक्रमण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कथित “तोंडी आदेशावर” झाल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे. जर हे खरे ठरले, तर हा प्रकार कायदे, नियम आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांची उघडपणे पायमल्ली करणारा आहे.
LIVE REPORTING दरम्यान स्थानिक नागरिकांनी SHAIKH GALIB यांच्याशी संवाद साधताना तीव्र संताप व्यक्त केला. सामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई होते, मात्र प्रभावशाली लोकांवर नियम का लागू होत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणासमोर सार्वजनिक जागेवर अतिक्रमण होणे ही बाब केवळ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी नाही, तर संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेसाठीही गंभीर इशारा मानला जात आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, तात्काळ अतिक्रमण हटवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
आता पाहावे लागणार आहे की नगर पालिका आणि जिल्हा प्रशासन या गंभीर प्रकरणात ठोस कारवाई करते की हा विषयही केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहतो.
AIMA MEDIA Galib