logo

ना अवैध बांधकाम, ना कंत्राट घेणार उमेदवारांना शपथपत्र लिहावे लागणार नगरसेवक-कंत्राटदार युतीला बसणार लगाम बिल्डर आणि कंत्राट्दारांचे धाबे दणाणले

जळगाव : महानगरपालिका निवडणुकीत निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गाचा अवलंब केला जातो. मात्र, आता सत्तेचा गैरवापर करून स्वतःचे खिसे भरणे उमेदवारांना उमेदवारी कठीण जाणार आहे. अर्जासोबतच अवैध बांधकाम केलेले नाही आणि भविष्यात महापालिकेची कंत्राटे घेणार नाही अशा अटींचे शपथपत्र देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज भरताना आता केवळ नाव आणि पक्ष सांगून चालणार नाही. निवडणूक आयोगाने अर्जासोबत जोडल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रात अनेक नवीन अटींचा समावेश केला आहे. उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिक्षण आणि मालमत्तेसोबतच त्याच्या व्यावसायिक हितसंबंधांची सखोल माहिती देणे आता अनिवार्य झाले आहे.

भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणार नाही

निवडणूक प्रक्रियेत मतदारांना आमिष दाखवणे, पैसे वाटणे किंवा कोणत्याही भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मते मिळवणार नाही, असे लेखी अभिवचन उमेदवाराला द्यावे लागते. जर निवडणुकीनंतर भ्रष्टाचाराचे पुरावे सिद्ध झाले, तर त्याचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे.

अवैध बांधकाम न केल्याचे शपथपत्र

अनेकदा नगरसेवक किंवा त्यांचे कुटुंबीयच शहरात अवैध बांधकामे करण्यात आघाडीवर असतात. हे रोखण्यासाठी, मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अनधिकृत बांधकाम केलेले नाही, आ स्पष्ट शपथपत्र द्यावे लागेल.

निवडून आल्यानंतर कंत्राट घेणार नाही

निवडून आल्यानंतर नगरसेवक स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या नावाने महानगरपालिकेची कोणतीही सिव्हिल कंत्राटे, पुरवठा आदेश घेणार नाहीत, असे शपथपत्रात नमूद करावे लागेल. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या 'नगरसेवक-कंत्राटदार' युतीला लगाम बसेल.

12
757 views