logo

*ग्रामपंचायती मध्ये चाललेल्या गैर कारभाराबद्दल ग्रामशिपायास विचारल्याचा राग धरून एक सखा भाऊ भावाचा कसा वैरी ठरला.* *मोठ्या भावावरच केला जीवघेणा हल्ला!

रामदास ढोरमले
वार्ताहर! मौजे जातेगांव, पारनेर
अहिल्यानगर
*ग्रामपंचायती मध्ये चाललेल्या गैर कारभाराबद्दल ग्रामशिपायास विचारल्याचा राग धरून एक सखा भाऊ भावाचा कसा वैरी ठरला.* *मोठ्या भावावरच केला जीवघेणा हल्ला!*
घटना मौजे जातेगांव ता पारनेर, अहिल्यानगर येथील आहे.
मृत वडिलांचे नावे असलेले एक जुने घर, एक भाऊ परस्पर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन खोटे कागदपत्र दाखवून इतर भावांची संमती न घेता स्वतःच्या नावावर करून स्वतः घरपट्टी भरून घर स्वतःच्या मालकी चे कसा दाखवू शकतो? असा प्रश्न ग्रामपंचायत कार्यालयातील चाललेल्या अवैध कारभार कसा काय करता? असा प्रश्न ग्रामशिपायास विचारला तर त्याने सरळ सरळ सांगितले की ज्यांनी हे केले ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांनी सांगितले म्हणून आम्ही करून घेतले. माझा प्रश्न त्याने घर स्वतःच्या नावावर का केले हा मुळीच नव्हता, पण त्यासाठी लागणारे कागदपत्र आणि इतरांचे नाहरकत का नाही मागितले. याचा अर्थ आपल्या ग्रामपंचायत मध्ये कसलेही बेकायदेशीर काम करत आहात किंवा तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात कुठचाही ग्रामसदस्य काहीही सांगेल तसें अवैध काम पण करणार का? तर ग्रामशिपाई निरुत्तर होऊन त्याने ती हकीकत त्या ग्रामसदस्य असलेल्या भावास सांगितली त्याचा राग मनात ठेवून सरळ सरळ मोठ्या भावाला जाब विचारायला मोठ्या भावाच्या घरी येऊन त्यास मारहाण केली. जीवे मारण्याची धमकीही दिली. आता हे प्रकरण मी ग्रामपंचायत सरपंच यांचे कडे सोपवत आहे. पुढील रीतसर कार्यवाही व्हावी अशी ग्रामसभे पुढे मांडणार आहे. व यासारखी अनेक प्रकरणे ग्रामकार्यालयात होत आहेत किंवा झालेली आहेत. सर्वांची रीतसर चौकशी व्हावी अशी मागणी गावचे रहिवाशी म्हणून करत आहे.

17
884 views