logo

भंगार चोरी रोखली! AIMA MEDIA च्या बातमीनंतर हालचाल

बीड प्रतिनिधी : गालिब
बीड जिल्हा रुग्णालयातून नगरपालिकेच्या टेम्पोमधून नेण्यात आलेल्या भंगारप्रकरणी AIMA MEDIA ने सर्वात आधी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून तात्काळ ॲक्शन घेण्यात आली आहे. AIMA MEDIA च्या बातमीनंतर संबंधित विभागांमध्ये खळबळ उडाली आणि भंगार परत रुग्णालयात आणण्यात आले, त्यामुळे संभाव्य चोरीचा प्रकार थांबला आहे.
जिल्हा रुग्णालयातून रात्रीच्या अंधारात भंगार उचलून नेण्यात आल्याचा संशयास्पद प्रकार AIMA MEDIA ने सर्वप्रथम उजेडात आणला होता. या बातमीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला आणि प्रशासनावर दबाव निर्माण झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार, भंगार नेण्यात आलेला टेम्पो परत बोलावण्यात आला असून भंगार पुन्हा रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे भंगार चोरीचा मोठा प्रकार होण्याआधीच तो रोखण्यात यश आले आहे.
या प्रकरणात AIMA MEDIA च्या पाठपुराव्यामुळेच ही तात्काळ कारवाई शक्य झाली, अशी चर्चा शहरात सुरू आहे. अन्यथा हा भंगार नेमका कुठे गेला असता आणि कोणाच्या फायद्यासाठी वापरण्यात आला असता, यावर मोठे प्रश्नचिन्ह होते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच नियमबाह्य पद्धतीने भंगार उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
AIMA MEDIA मुळे शासकीय यंत्रणेतील संभाव्य गैरप्रकार वेळीच उघडकीस आल्याचे बोलले जात आहे.

27
1386 views