logo

*"मौर्य ते शिवकाळ... इतिहासाच्या साक्षीदार नाण्यांचे श्री शिवाजी महाविद्यालयात भव्य प्रदर्शन संपन्न !"*

*"मौर्य ते शिवकाळ... इतिहासाच्या साक्षीदार नाण्यांचे श्री शिवाजी महाविद्यालयात भव्य प्रदर्शन संपन्न !"*


[ चिखली ] Aima news network Buldhana sadique Shah district vice President Buldhana
येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने 'प्राचीन भारतीय नाणी आणि संस्कृती' या विषयावर भव्य प्रदर्शनाचे २३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रमोद पडोळे,प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर क्षीरसागर,उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.बुलढाणा व आत्माराम अनाळकर गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनातील मुख्य आकर्षणे
या प्रदर्शनात मौर्य काळ, ग्रीक क्षत्रप कालीन, सातवाहन काळ, सुलतानशाही कालीन, मुगल कालीन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील 'होन' व 'शिवराई' यांसारख्या विविध दुर्मिळ नाण्यांचा समावेश होता. ही नाणी पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.
*प्राचीन नाणी: सोन्याची, चांदीची आणि तांब्याची विविध आकारांतील नाणी.*
*ऐतिहासिक माहिती: प्रत्येक नाण्यासोबत त्याचा काळ, राजाचे नाव आणि त्या काळातील आर्थिक स्थितीची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.*
इतिहास विभागाच्या प्रा.सतिश काळे यांनी ही नाणी संकलित करून त्यांचे वर्गीकरण केले होते.प्रबोधन आणि वारसा जतन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपशिक्षणाधिकारी परमेश्वर क्षीरसागर यांनी सांगितले की, "नाणी हा केवळ विनिमयाचे साधन नसून तो इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. तरुण पिढीला आपल्या वैभवशाली वारशाची ओळख व्हावी, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे."
या प्रदर्शनाला शहरातील इतर शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तसेच पंचक्रोशीतील इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने भेट दिली. या प्रदर्शनामध्ये चंद्रगुप्त मौर्य,कुशाण राजा कनिष्क,इंडो ग्रीक सत्रप, सातवाहन कालीन, दिल्लीचे सुलतानशाही,शेरशाह सुर यांनी सुरू केलेला रुपया, अकबर - जहांगीर- शहाजहान - औरंगजेब यांच्या काळातील नाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकाच्या वेळी सुरू केलेली होन - शिवराई,त्याचबरोबर राजाराम महाराज,थोरले शाहू महाराज, पेशवेकालीन,नागपूरच्या भोसल्यांच्या नाणी प्रदर्शनात पाहायला मिळाली.पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या इंदोर संस्थानची महादेवाची पिंड व बेल असणारे नाणी या प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.या प्रदर्शनामध्ये इंग्रजच्या शासन काळातील राणी व्हिक्टोरिया द्वितीय,राजा एडवर्ड, राजा पंचम जॉर्ज यांच्या प्रतिमा असलेली नाणी तसेच महात्मा गांधींच्या निधनानंतर भारत सरकारने त्यांच्या स्मृती प्रीतीर्थ काढलेले दहा रुपयाचं नाणे सुद्धा प्रदर्शनामध्ये पाहण्यासाठी ठेवलेले होते. तसेच देश विदेशातील विविध चलनी नोटा - सिक्के हे सुद्धा प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले जे नामशेष झालेले आहेत.
प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक सतिश काळे व इतिहास विभागाचे कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सतीशकुमार पडघान,प्रा.किसन वाघ,प्रा.मनीषा सरोदे,कु.भक्ती शेटे,कु.आरती होळकर,ऋषिकेश महाले यांनी विशेष प्रयत्न केले. *तर कार्यक्रमासाठी नाणेतज्ञ दिलावर शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.*

26
1593 views