logo

वाळूमाफियांनी जप्त ट्रॅक्टर पळविले



धुळे : जिल्ह्यात वाळूमाफियांनी

महसूल विभागाच्या कारवाईला न जुमानता जप्त केलेला वाळूचा ट्रॅक्टर पळवून नेल्याची धक्कादायक घटना बिलाडी-न्याहळोद रस्त्यावर २७ रोजी पहाटे घडली. याप्रकरणी देवपूर पोलिसांत ट्रॅक्टर मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्याहळोदच्या मंडळाधिकारी ललिता आनंदराव वाघ या पहाटे पथकासह गस्तीवर असताना त्यांना बिलाडी गावाजवळ एक विनानंबरचा लाल रंगाचा ट्रॅक्टर संशयास्पदरीत्या येताना दिसला. हा ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे दीड ब्रास अवैध वाळू मिळून आली. मंडळाधिकारी वाघ यांनी ट्रॅक्टर जप्त करत तो धुळे तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश चालकाला दिले. मात्र, ट्रॅक्टरचालक योगेश सुभाष कोळी याने पथकाला चकवा देऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह वेगाने पळवून नेला.

14
594 views