
*स्वतःवरचा विश्वासच यशाचा मार्ग, प्रेरणादायी व्याख्यान यशस्वी.*
*विलास केजरकर भंडारा*
प्रेस नोट
ठाणा पेट्रोल पंप (जवाहरनगर),भंडारा
*स्वतःवरचा विश्वासच यशाचा मार्ग, प्रेरणादायी व्याख्यान यशस्वी.*
*विलास केजरकर भंडारा*
*भंडारा*:- तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित आर्ट्स अँड कॉमर्स डिग्री कॉलेज, ठाणा पेट्रोल पंप (जवाहरनगर),भंडारा येथील महिला तक्रार निवारण समिती द्वारे महिला पखवाडा कार्यक्रम प्राचार्य डॉ. अजयकुमार एस. मोहबंसी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयसीसी समिती अध्यक्ष प्रा. डॉ. अनिता वंजारी होत्या. प्रमुख मार्गदर्शक ओमसत्यसाई कला, विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वंदना मोटघरे, प्रा. डॉ. राजेद्रप्रसाद पटले, प्रा. डॉ. सुनिता रविदास, प्रा. पौर्णिमा रहांगडाले, अधिक्षक ललीतकुमार पी. ठाकुर, प्रा. डॉ. साधना वाघाडे, प्रा. प्रियल भूरे उपस्थित होते.
आपण स्वतःबद्दल सकारात्मक भावना ठेवून आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावे त्यामुळे आपण कोणत्याही आव्हानांना न घाबरता सामोरे जातो. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान असणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन परिसर केवळ शिक्षणाचे मंदिर नाही तर तुमच्या व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र आहे. ICC समिती ही विद्यार्थी-विद्यार्थिनी करीता सन्मानाने रक्षण करण्यासाठी तत्पर असते. विद्यार्थिनींनी निर्भयपणे आपले मत मांडावे असे आवाहन प्रमुख मार्गदर्शन प्रा. डॉ. वंदना मोटघरे यांनी केले.
विद्यार्थिनींनी आत्मविश्वास बाळगावा आणि कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये. लैगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा आणि सायबर गुन्हे, मानवी हक्कांबाबत वेगवेगळे उदा. देऊन सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. अनिता वंजारी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
महिलांनी निर्भयपणे जगण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आपल्या हक्काची जाणीव असणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींनी स्वावलंबी आणि जागरूक बनावे. शिक्षणाइतकेच कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. महिलांचे हक्क याविषयी सविस्तरपणे प्रा. डॉ. राजेंद्रप्रसाद पटले यांनी समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन केले. विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपले विचार सेमिनार द्वारे मांडले. निबंध स्पर्धा घेण्यात आली.
यात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान, मानवी हक्क आणि कायदे, लैंगिक समानता, स्वच्छता आणि आरोग्य याविषयावर प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले.
प्रास्ताविकेतून ICC समितीची रचना, कार्यपद्धती, उद्दिष्टे याविषयीची माहिती डॉ. वाघाडे मॅडम यांनी दिली . संचालन प्रा. डॉ. रविदास मँडम व प्रा. रहांगडाले मँडम तर आभार प्रदर्शन प्रा. प्रियल भूरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015