logo

*खोकरल्याच्या 'सुमनोहर सेलिब्रेशन लॉन'वर जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई* *घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर उघड* *विलास केजरकर भंडारा*

प्रेस नोट
खोकरला, खात रोड
भंडारा

*खोकरल्याच्या 'सुमनोहर सेलिब्रेशन लॉन'वर जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई*
*घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर उघड*
*विलास केजरकर भंडारा*

*​भंडारा*:- शहरा लगतच्या खात रोडवरील खोकरल्याच्या 'सुमनोहर सेलिब्रेशन लॉन' येथे घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी दुपारी टाकलेल्या छाप्यात एकूण ८ सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. तसेच संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर माहितीनुसार भंडारा येथील जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वात सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, खरेदी अधिकारी सुहास टोंग, पुरवठा निरीक्षण पोचिराम कापडे, पुरवठा निरीक्षक चक्षुपाल भिमटे यांच्या पथकाला सुमनोहर सेलिब्रेशन लॉनमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास पथकाने या ठिकाणी अचानक छापा टाकला.
येथील ​किचनमध्ये आढळले गंभीर उल्लंघन ​छाप्यादरम्यान लॉनच्या किचनची तपासणी केली असता, तेथे उपस्थित असलेले अनिल मारोतराव चव्हाण (वय ६८ वर्ष रा. भंडारा) यांना पथकाने कारवाईचे प्रयोजन स्पष्ट केले. किचनमध्ये सर्व बर्नर एका पाईपद्वारे जोडलेले आढळले. या ठिकाणी एच.पी.सी.एल. कंपनीचे १ भरलेले, १ अर्धवट भरलेले आणि इतर ६ रिकामे, असे एकूण ८ सिलिंडर आढळून आले.

*​मालकाची उडवाउडवीची उत्तरे*

​घरगुती वापराचे गॅस सिलिंडर व्यावसायिक कामासाठी वापरण्याबाबत पथकाने चव्हाण यांच्याकडे परवाना किंवा आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पुरवठा विभागाने दोन पंचांच्या समक्ष पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. व संद्याकाळी उशिरा पोलीस स्टेशन भंडारा येथे अत्यावशक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३, ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यापुढे कोणीही घरघुती गॅस चा व्यावसायिक वापर करू नये. जर अश्या प्रकारे घरघुती गॅस चा व्यावसायिक वापर होत असल्याचे अढळल्यास संबंधितावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केले आहे.


RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
319 views