logo

श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न.

संपादित बातमी:

(लोणी प्रतिनिधी : तेजस वाळुंज)

लोणी (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आठवडे बाजार व खाऊ गल्ली या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते.
या आठवडे बाजाराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कोचर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, समाजभूषण कैलासराव गायकवाड, पोलीस पाटील संदीप आढाव, माजी सरपंच रंजना ताई लंके, माजी उपसरपंच दिलीप आदक, गणेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मंगल ताई गायकवाड, आंबेगाव तालुका दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शिनलकर, शालेय समितीच्या अध्यक्षा माधुरी ताई खंडागळे, सदस्य गीतांजली लंके, राहुल भागवत, प्राचार्य ढगे सर, तांबोळी सर, संतोष पोखरकर, सागर गायकवाड, राहुल डोके आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावलेल्या खाऊच्या स्टॉलवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांना आर्थिक देवाण-घेवाण, खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी पाणीपुरी, मेंदू वडा, ओली-सुकी भेळ, मंचुरियन, मासवडी, ढोकळा आदी चविष्ट पदार्थांचे स्टॉल लावले होते. तसेच काही विद्यार्थ्यांनी कांदे, बटाटे, विविध फळभाज्या व पालेभाज्यांमध्ये आळूची पाने, मेथी, हरभऱ्याची भाजी, कोथिंबीर आदी भाज्यांची विक्री केली.
ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी या बालचमूच्या बाजाराचा मनसोक्त आनंद घेतला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेने केले होते.
माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीचे अध्यक्ष उदयराजे वाळुंज तसेच प्रबोधनीचे आधारस्तंभ डॉ. कैलास गायकवाड यांनी या उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले.

26
4153 views