logo

पत्ता विचारण्याचा बहाणा, वृद्धेची सोनपोत लंपास के बोलण्यात गुंतवून ठेवत ओढली पोत, चोरटे पसार

जळगाव : दुचाकीवर आलेल्या दोघांनी ८. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात व गुंतवून ठेवत प्रतिभा बाबुराव चौधरी (६९, वरा. भूषण कॉलनी) या वृद्धेच्या गळ्यातून १७.५० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत

याप्रकरणी वृद्धेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरून नेली. ही घटना दि. २६ डिसेंबर रोजी भूषण कॉलनीत घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूषण कॉलनीतील प्रतिभा चौधरी या घराच्या कंपाऊंडमध्ये उभ्या असताना दुचाकीवर आलेले दोन जण त्यांच्या घराजवळ थांबले. त्यातील मागे बसलेला एक जण पत्ता विचारण्यासाठी वृद्धेजवळ आला व 'राजाराम येथे राहतात का?' असे विचारून बोलण्यात गुंतवून ठेवत वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढली व बाजूला थांबलेल्या दुचाकीवर बसून पसार झाला.

3
37 views