logo

*रविवार ला भंडारा येथे महाचर्चा, महासंवादाचे आयोजन* *विलास केजरकर भंडारा*.

प्रेस नोट
भंडारा

*रविवार ला भंडारा येथे महाचर्चा, महासंवादाचे आयोजन*
*विलास केजरकर भंडारा*.

*भंडारा*:- अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोंदिया च्या वतीने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजाचे अनुसूचित जातीचे आरक्षण पुर्ववत करणेबाबत महाचर्चा, महासंवादाचे आयोजन रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ ला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सनत वाढई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिक गेडाम राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून सदस्य तथा मार्गदर्शक प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, प्रा. डॉ. एम. के. भानारकर, अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोंदियाचे सदस्य प्रा. डॉ. दिशाताई गेडाम इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणा संदर्भात अद्ययावत माहिती देणेबाबत व पुढील रणनीती तयार करण्याबाबत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील १५ तालुक्यातील समाज बांधवांची बैठकीला सहभागी होणार आहेत.
तरी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहून आरक्षण लढा समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावे असे आवाहन अखिल ढिवर समाज विकास समितीचे केशव कोल्हे, अध्यक्ष मनोज केवट, कोषाध्यक्ष डॉ. माधव मानकर, सचिव गोविंद मखरे यांनी केले आहे.


RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
190 views