logo

प्राणी मित्र ,सर्प मित्र चैताली भस्मे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

*चैताली भस्मे (बुलढाना ) शेगाव येथे राज्यस्तरीय कृतिगौरव पुरस्कारने सम्मानित*
बी. एस.एफ.बहुउद्देशीय संस्था अमरावती , संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाना,संकल्प बहुउद्देशीय संस्था अकोला व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने साई गजानन मंगल कार्यालय ( बुलढाडना ) शेगाव येथे राज्यस्तरीय कृति गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला होता .नागपूर येथून अभिनेत्री महिला सर्पमित्र ,प्राणीमित्र वन्यजीव रक्षक आणि समाजसेविका चैताली भस्मे यांना त्यांच्या निस्वार्थ ,प्राणिसेवा ,समाजसेवेसाठी साहित्यिक सतीश शिंदे यांच्या हस्ते कृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमात ( सोशल वेल्फेअर फाऊंडेशन नाशिक ) अध्यक्ष अमोल जाधव प्रसिद्ध साहित्यिक सतीश शिंदे ( कल्याण , मुंबई ) भूषण नी. सरदार , वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार , लोकमत पत्रकार विष्णू गायकवाड इत्यादी पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते

48
2457 views