
तालुका पत्रकार संघटनेतर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा
@ अहेरी तालुक्यातील १४५२ विद्यार्थ्यांच्या सहभाग
तालुका पत्रकार संघटनेतर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा
@ अहेरी तालुक्यातील १४५२ विद्यार्थ्यांच्या सहभाग
अहेरी
Bपत्रकार दिनाच्या औचित्ताने तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तालुक्यातील 14 केंद्रावर माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेत १हजार ४५२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, भगवंतराव शिक्षण मेमोरियल संस्थेतील शाळा,धर्मराव शिक्षण मंडळाच्या शाळा व इतर संस्थांचा सहभाग होता.
जीमलगट्टा, पेरमिली, गुड्डीगुडम, कमलापूर, इंदाराम,महागाव,बोरी खमणचेरू,वेलगुर, आलापल्लीतील अशा 14 केंद्रावर माध्यमिक गटातील नववी व दहावी करिता स्पर्धात्मक युगात स्पर्धेची माहिती व तयारी होण्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व पर्यवेक्षक म्हणून आसिफ पठाण,रमेश बामनकर,डॉ. शंकर दुर्गे,साई चंदनखेडे, मुकुंदा दुर्गे, संजय गजलवार, उमेश पेंड्याला, दीपक चुनारकर,सदाशिव माकडे, बबलू सडमेक, व्यंकटेश चालूरकर, जावेद अली,शहाजी रत्नम,अनिल गुरनुले,विस्तारी गंगाधरीवार, श्रीकांत दुर्गे यांनी विविध केंद्रावर कार्य केले. तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल पत्रकार दिनी आयोजित आलापल्लीतील कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.