logo

उज्वल अकॅडमी व क्युरिओसिटी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा मनसोक्त आनंद...




नांदेड सांगवी येथील प्रा.माधव खिल्लारे सरांच्या उज्वल अकॅडमी व क्युरिओसिटी स्कूलच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सहल 2025चे आयोजन करण्यात आले होते क्यूरिओसिटी स्कूलची डोक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नारवट वनविभागाच्या म्हणजेच गुड्डामहादेव येथील मंदिरास तर उज्वल अकॅडमी ची एम.एच.26वाटरपार्क रोहा येथे आयोजन करण्यात आले होते. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वनविभाग परिसरात तर उज्वल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना जलतरणाचामनसोक्त खेळण्याचा व विविध गाण्यांच्या चालीवर डान्स करून आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी स्लाइडींग डान्स,वेव्ह डान्स,रेन डान्स बॉलीवूडच्या रंगतदार गितांवर करून निसर्गारम्य वातावरणात तल्लीन झालेले पाहायला मिळाले. तसेच शाळेतील शिक्षकांनी तेथील वनविभागाने दिलेल्या वन्य जीवांच्या माहीतीचे फलक चिमुकल्यांना दाखवून त्याची माहीती दिली.यावर यानंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला व म्यूझिकच्या तालावर डान्स देखील केला.परतीच्या प्रवासात चेहरृयावरील आनंद सांगत होता कि, निसर्ग किती निस्वार्थी आहे. यावेळी संचालक प्रा. माधव खिल्लारे व संचालिका तथा मुख्याध्यापिका सौ.आशा खिल्लारे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांसोबत बालगितावर डान्स करून विद्यार्थ्यांशी समरसता दाखविल्याबद्दल पालकांकडून कौतूक व्यक्त केले जात आहे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आशा खिल्लारे मॅडम, अंजली मिस,मोदींनी मिस सोनिया मिस , अंकिता मिस व गितांजली मावशी यांनी परिश्रम व विद्यार्थ्यांची काळ्जी घेतली

2
14 views