logo

मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या २३ व्या PAMA Global Abacus & Mental Arithmetic Competition मध्ये अक्षरशिल्प PAMA इंडियाच्या विद्यार्थ्यांनी

संवाददाता श्री सुरेश खामकर अहिल्यानगर जिल्हा

Congratulations Devang achieve Champion 🏆

मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या २३ व्या PAMA Global Abacus & Mental Arithmetic Competition मध्ये
अक्षरशिल्प PAMA इंडियाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश मिळवले आहे.
१९९९ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांची परंपरा जपणाऱ्या PAMA Global मध्ये आज २८ देशांचा सहभाग असून,
या स्पर्धेत २८ देशांतील ५९९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
PAMA Global ची अधिकृत सदस्य संस्था असलेल्या अक्षरशिल्प PAMA इंडिया
भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे,
आणि याच व्यासपीठावर भारतीय विद्यार्थ्यांनी देशाचा गौरव वाढवला आहे.
या स्पर्धेत भारताकडून
👉 ८ चॅम्पियन्स
👉 ७ प्रथम क्रमांक
👉 १७ द्वितीय क्रमांक
👉 १२ तृतीय क्रमांक
अशी एकूण ४४ विद्यार्थ्यांनी पदके जिंकत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला! 🇮🇳
यामध्ये संगमनेर मधून देवांग क्रिएशनच्या चार विद्यार्थ्यांची निवड झालेली होती त्यामध्ये देवांग लंकेश पठाडे याने चॅम्पियन तर आरंभ निलेश
शिंदे याने चॅम्पियन व अर्णव अमोल हांडे याने फर्स्ट Runner up तसेच आराध्य हर्षद बिबवे याला सेकंड Runner up हे पारितोषिक मिळाले आहे
यांच्या मार्गदर्शक शिक्षिका सोनाली लंकेश पठाडे या आहेत
हे यश विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, पालकांचे
आणि अक्षरशिल्प PAMA इंडियाच्या मार्गदर्शनाचे सामूहिक यश आहे.
भारताच्या या बुद्धिमान पिढीला मनापासून सलाम!

0
14 views