logo

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील समूह नृत्यात अहेरी उपविजेता

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील समूह नृत्यात अहेरी उपविजेता

जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा गडचिरोली येथे 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलामुलींच्या वैयक्तिक व सांघिक स्पर्धा चालू आहेत. यात काल झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील समुह नृत्य स्पर्धेत अहेरी पंचायत समितीने उत्कृष्ठ प्रदर्शन करून उपविजेतेपद पटकविले.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेलगुर येथील कु. मीनाक्षी कुमरे व कु. एलावार यांच्या मार्गदर्शनातील मुलींच्या चमुने उत्कृष्ट समूह नृत्यात सहभाग घेतला होता.
जिल्हा क्रीडा स्पर्धेतील सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक टी.बी. नैनलवार, पी.पी.आचेवार, विनोद खांडेकर,लक्ष्मण रत्नम, कु. रापरतीवार यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रोत्साहित केले.

35
5215 views