logo

महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडित सुशासन दिना'निमित्त स्वच्छता अभियान यशस्वी

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- भारतरत्न, माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त दिनांक २५ डिसेंबर २०२५ ला संपूर्ण देशात 'सुशासन दिन' म्हणून साजरा केला जातो. या पवित्र दिनाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशन व भारतीय जनता पार्टी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनच्या परिसरात स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आली.
या अभियानाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज व स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्वच्छता अभियान गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौकानंतर महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनच्या परिसरात स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आली.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके, नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. मधुराताई मदनकर व नंदगोपाल फाऊंडेशनचे सदस्य भाजपचे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. जुम्मा प्यारेवाले, महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे, उपाध्यक्ष क्रिष्णा उपरिकर, नंदगोपाल फाऊंडेशनचे सदस्य विलास केजरकर, नवनियुक्त नगर सेवक शिवशंकर आजबले, दिवानजी आकाश कटणकर, नागेश ताईतकर, जितेंद्र ढेंगे, लोकेश गाढवे, प्रमोद हजारे व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
भंडारा शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी या स्वच्छतेत सर्वांचा सहभाग अत्यंत मोलाचा असल्याने या स्वच्छता अभियानात मोठ्या संख्येने नागरिक एकवटले होते.
स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी रवि बोरकर, ज्ञानेश्वर सोलंकी, अतुल मेंढे, निखिल केवट, विनोद सार्वे, सुरेश कटणकर, गोलू गाढवे, राहुल घडिले, अक्षय ईळपाचे, अनुराधा मेश्राम, पिंकी शेलारे, कांचन खोब्रागडे, धर्मेंद्र भोंडेकर व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी सहकार्य केले.

5
715 views