
मुखेड जिल्हा नांदेड महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या वतीने 'पूरग्रस्तांना आर्थिक मदतनिधीचे वाटप
आज महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा द्वारा कॉ विनोद गोविंदवार सर यांच्या अथक परिश्रमाने महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद यांच्या विद्यमानाने आज हसणाळ पमु तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील पूरग्रस्त भूमीहीन शेतमजुरांना व एकल महिला अश्या २३ गरजूंना आर्थिक मदत करण्यात आली.या वेळी हसनाळ दुर्घटना जबाबदार कोण? अहवाल प्रत पुस्तक सत्य शोधक समिती व इतर मान्यवर यांच्या पुढाकाराने प्रकाशित झालेले पुस्तक महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद यांना देण्यात आले. या वेळी उपस्थित हसनाळ पमु येथील भूमीहीन शेतमजूर व सर्व गावकरी यांच्याकडून महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे मनस्वी धन्यवाद करण्यात आले महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या वतीने 'पूरग्रस्तांना आर्थिक मदतनिधीचे वाटप
मुखेड : दि. 25/12/2025
या वर्षी ऑगस्ट महिन्यात मराठवाडाच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात निसर्गाने हाहाकार माजवला होता. महापुराने अनेक गावे वेढली गेली तर काही गावांचे क्षणात होत्याचे न्हवते झाले. अनेकांचे संसार संपले, अनेक माणसे मेली, काही माणसे वाहून गेली, या महापुरात कुणाला स्वतःचे लेकरू, कुणाची आई, कुणाची बहिण, कुणाचा भाऊ, कुणाचे वडील तर कुणाला स्वतःची पत्नी गमवावी लागली. अशीच अवस्था होती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असणाऱ्या हसनाळ गावाची.
संध्याकाळची वेळ मुसळधार पाऊस चालू होता. सारे गावकरी आपापल्या घरात शांत झोप घेत होते. परंतु निसर्गाच्या मनात काही वेगळेच चालू होते. धो धो पाऊस कोसळत होता. नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता. हा प्रवाह रौद्ररूप धारण करून हसनाळ गावाच्या दिशेने प्रचंड वेगाने वाहत असताना गावकरी मात्र गाढ झोपत होते. रात्रीच्या अंधारात पाण्याचा प्रवाह काळ बनून जेव्हा गावात आला तेव्हा अगदी क्षणार्धात गावचे होत्याचे नव्हते झाले. अनेक माणसे मेली, अनेक माणसे गाडली गेली. शेकडो जनावरे वाहून गेली.
अशा वेळी गरज होती ती प्रत्येकानी माणुसकीचा धर्म पाळत आपापल्या परीने यांना मदत करण्याची. महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेने हि सामाजिक बांधिलकी ओळखून आपल्या सर्व सभासद मान्यवरांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आणि आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही सामाजिक बांधिलकी जोपासत महाराष्ट्रातील तत्त्वज्ञान विषयाच्या तमाम प्राध्यापक बंधू भगिनीं, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे सर्व पदाधिकाऱ्यानी सढळ हाताने मदत केली आणि बघता बघता लाखो रुपयांचा मदतनिधी जमा झाला. सर्वांशी विचार विमर्श करून तो निधी हसनाळ या गावातील अपातग्रस्तांना द्यावा असे निश्चित करण्यात आले.
दिनांक २५/१२/२०२५ रोजी मदत निधी वाटप कार्यक्रमाचे आयोजन मुखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय करण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुनीलदत्त गवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात हा मदतनिधी वितरित करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.डॉ. अर्जुन गजमल सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे खजिनदार प्रो. डॉ. ग्यानदेव उपाडे केले. कार्यवाह प्रो. या प्रसंगी प्रा डॉ. महेंद्र होणवडजकर, प्रा. संग्राम सोळुंके, हसनाळ गावचे उपसरपंच विठ्ठल शिंदे, विनोद गोविंदवार आणि अपातग्रस्त भूमिहीन शेतमजूर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ माधव कांबळे यांनी केले तर आभार प्रा डॉ सखाराम गोरे यांनी मानले.
अतुलनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे पुनश्च धन्यवाद.
- महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे आभार 🙏