
न्यू महाराष्ट्र सदन दिल्ली येथे अटल सन्मान सोहळा संपन्न .
न्यू महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय अटल सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला. न्यू . दिल्ली - ( बालाजी पडोळे -विशेष प्रतिनिधी )या सोहळ्यामध्ये आरोग्यदूत मंगेशजी चिवटे यांना “अटल श्री” या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार केंद्रीय कृषी राजमंत्री ना.भगीरथ चौधरी, राज्यसभा खासदार तसेच राज्यसभा उपाध्यक्ष सौ. गीता शक्य , मा. खासदार अविनाश राय खन्ना , राष्ट्रीय अध्यक्ष सौ. अपर्णा सिंह, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.अटल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे, राष्ट्रीय महामंत्री शीतल खांडील आणि महाराष्ट्र प्रदेश महामंत्री हेमंत पाटील हे देखील उपस्थित होते तसेच नाशिक जिल्ह्यातून ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्था तसेच अटल फाउंडेशनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलेल्या सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्याचे थेट राजधानी दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे आढावा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.संस्थेचे प्रमुख, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक मुकुंद काकड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील अटल फाउंडेशनचे पदाधिकारी अध्यक्ष रामदास भोर, जिल्हा संपर्क प्रमुख श्जुशेठ शिंदे, युवा नेते बोराडे आणि आदिवासी समाजातील राया ठाकर फाउंडेशन सिन्नर तालुका अध्यक्ष आणि अटल फाउंडेशनचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेले लेखक हिरामण आगिवले हे उपस्थित होते.आणि तसेच राज्यस्थान, कोल्हापूर, सोलापूर,लातूर, यूपी, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, अश्या अनेक भागातील जिल्ह्यातून,राज्यातून आलेले मंत्री,खासदार,अटल फाउंडेशनचे पदाधिकारी, तसेच सर्वसामान्य कार्यकर्ते उपस्थित होते.. तसेच हे पुस्तक बघून सर्वांनी ह्या आढावा पुस्तकाचे कौतुक करत सर्वांनी मुकूंद काकड आणि रामदास भोर यांचे आभार मानत नाशिक येथून आलेल्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचे संजुशेठ शिंदे, सर्वेश बोराडे हिरामण आगिवले यांचे देखील कौतुक करत त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.