logo

लोकबिरादरी प्रकल्पाचा ५३ व्या वर्षांत पदार्पण. विविध उपक्रमांनी वर्धापन दिन उत्साहात साजरा.

भामरागड ता.24- तालुक्यातील प्रसिद्ध समाजसेवा केंद्र लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा आज (२३ डिसेंबर) ५२ वर्षे पूर्ण करुन ५३ व्या वर्षात पदार्पण केले.यावेळी लोकबिरादरी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
५२ वर्षांपूर्वी कर्मयोगी बाबा आमटे यांनी भामरागडच्या निभीड अरण्यात हेमलकसाजवळ लोकबिरादरी प्रकल्प नावाचे सेवाकेंद्र उभारले.तेव्हापासून आजतागायत अविरत सेवाकार्य सुरू आहे.लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे केवळ एक संस्था नसून सेवा,करुणा,समर्पण आणि माणुसकीचा जीवंत आदर्श आहे.वंचित,आदिवासीं अतिदुर्गम भागातील समाजासाठी शिक्षण,आरोग्य आणि आत्मसन्मान यांचा प्रकाश पोहोचवण्याचे महान कार्य या प्रकल्पाने गत ५२ वर्षात अखंडपणे केले आहे.पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे याचा हा सेवायज्ञ हजारोंच्या जीवनात आशेचा किरण बनला आहे.खरी सेवा ही निःस्वार्थ भावनेतूनच जन्माला येते.अशाी शिकवण लोकबिरादरी प्रकल्पाने समाजाला दिली.
२३ डिसेंबर १९७३ ला लोकबिरादरी प्रकल्पाचा जन्म झाला,त्या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाले. त्याप्रित्यर्थ अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक असा अभिमानास्पद क्षण साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम श्रद्धेय,कर्मयोगी बाबा आमटे व सेवाव्रती साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांना पद्मश्री डॉ. प्रकाशभाऊ आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तद्नंतर कला दालनात एलिमेंटरी व इंटरमेटनंतर प्रथमच सुरू होत असलेल्या ड्राईंग सीईटी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष म्हणून लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे हे होते.उद्घाटक म्हणून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तथा उपविभागीय अधिकारी एटापल्लीचे अमर राऊत होते.मुख्याध्यापक गिरीष कुलकर्णीं इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी चित्रकलेत प्राविण्य प्राप्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रम शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका समिक्षा आमटे यांनी केले. संचालन विजया कीरमिरवार यांनी तर उपस्थितांचे आभर मुख्याध्यापक गिरीष कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

7
90 views