logo

पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक


अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई

मुंबई : एका खासगी कंपनीच्या लेखा
परीक्षणादरम्यान कंपनीला ९८ लाखांचा कर लावण्याची धमकी देत ते प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (सीजीएसटी) अधीक्षकाला सीबीआयने मुंबईत अटक केली. अंकित अगरवाल असे त्याचे नाव आहे.

संबंधित कंपनीच्या संचालकांनी अधिकाऱ्याची तक्रार केल्यानंतर सीबीआयने सापळा रचून अगरवालला लाचेचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना अटक केली.
घरात १८ लाखांची रोकड अटक केल्यानंतर सीबीआयने या अधीक्षकाच्या निवासस्थानी छापेमारी केली. असता त्याच्याकडे १८ लाख ३० हजारांची रोकड, ४० लाख रुपयांच्या आणि ३२ लाख रुपयांच्या मालमत्तांची कागदपत्रेही आढळली.

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीचे लेखा परीक्षण करताना अगरवालने कंपनीच्या संचालकाला आपण कंपनीला ९८ लाख रुपयांच्या कराची नोटीस जारी करत असल्याचे सांगितले.

तसेच, हे प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, तडजोडीअंती लाचेची रक्कम १७ लाख रुपये निश्चित करण्यात आली.

15
531 views