logo

प्रचार रॅली, प्रचार सभांसाठी किमान ४८ तास अगोदर परवानगी आवश्यक...


प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार

राजकीय पक्षांच्या बैठकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा

अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आचारसंहिता काळात प्रचार सभा, प्रचाराची रॅली यासाठी किमान ४८ तास अगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, प्रचारासाठी वापरले जाणारे साहित्य, सोशल मीडियावर प्रचारासाठी वापरला जाणारा मजकूर आदींचीही पूर्वपरवानगी आवश्यक आहे. उमेदवारासह सूचक व अनुमोदकाचेही ना देय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे, उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

निवडणूक कार्यक्रम, आचारसंहिता, निवडणूक अधिकारी, प्रशासनाकडून उपलब्ध सुविधा, उमेदवारी अर्ज, विविध प्रकारच्या परवानग्या व याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश आदींची माहिती देण्यासाठी शहरातील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली होती. आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह सर्व निवडणूक अधिकारी, आचारसंहिता कक्षाच्या प्रमुखांनी उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, निवडणुकीचा जाहीर प्रचार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येणार आहे. मतमोजणी राज्य वखार महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोडावून क्रमांक ६ व ७ येथे होणार आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत दाखल करावे लागतील. निवडणुक खर्चाचा तपशील रोजच्या रोज देणे बंधनकारक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत सर्व सुचना देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र, ना देय प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नॉन क्रिमीलियरची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

#ElectionRules
#CampaignGuidelines
#ElectionCommission
#ModelCodeOfConduct
#ElectionLaw
#PoliticalCampaign
#CampaignPermission
#ElectionAwareness
#FreeAndFairElections
#ElectionCompliance
#RallyPermission
#CampaignMaterials
#DemocracyInAction
#LawAndOrder
#ElectionUpdates
#Amc
#Amccommissioner

8
932 views