logo

देवळीत ऐतिहासिक विजय! अपक्ष उमेदवाराने भाजपचा ३५ वर्षांचा गड भेदला

देवळी, [22/12/2025] – देवळी नगरपालिकेच्या निवडणुकीत एका ३५ वर्षीय तरुण अपक्ष उमेदवाराने भारतीय जनता पक्षाचा (भाजप) ३५ वर्षांपासूनचा गड भेदून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या निकालाने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.गेली ३५ वर्षे देवळी नगरपालिकेवर भाजपचे एकहाती वर्चस्व होते, जे माजी खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली होते. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तनाला कौल दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपचे आमदार आणि अन्य प्रमुख नेते असतानाही, तसेच मुख्यमंत्री, माजी खासदार नवनीत राणा आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारसभा होऊनही भाजपला नगराध्यक्षपद गमवावे लागले.नगरसेवकांमध्ये भाजपचे बहुमत असले तरी, नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार निवडून आल्याने आता नव्या नगराध्यक्षांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या विजयामुळे देवळीच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे.

1
1329 views