
राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे नगरसेवक बहुमतांनी विजयी . भाजपाचे नगराध्यक्ष अँड व्हते विजयी
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गटाचे १६ नगरसेवक विजयी, मात्र नगराध्यक्षपदी भाजपचे स्वप्नील व्हत्ते विजयी झाले . लातूर - ( शिवाजी श्रीमंगले Executive reporter विशेष प्रतिनिधी )
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल आज जाहीर झाला असून, या निवडणुकीत राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने नगरसेवक पदाच्या १६ जागा जिंकून नगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत आपला 'गड' राखला आहे. मात्र, प्रतिष्ठेच्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत त्यांच्या गटाचे उमेदवार अभय बळवंत मिरकले यांचा पराभव झाला असून, भाजपचे स्वप्नील व्हत्ते यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटासाठी 'गड आला, पण सिंह गेला' अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष विनायकराव जाधव पाटील यांनी शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. मात्र, या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाचे ३ आणि शिवसेना (उबाठा) गटाचे २ असे एकूण ५ उमेदवार निवडून आले, तर काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज आयटीआय येथे सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या देखरेखीखाली दुपारी २ वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले.
नगराध्यक्ष पदाचा निकाल: भाजपचा झेंडा .
नगराध्यक्ष पदाच्या तिरंगी लढतीत भाजपच्या स्वप्नील व्हत्ते यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मागे टाकत विजय मिळवला.
विजेते: स्वप्नील महारुद्र व्हत्ते (भाजप) – ९,३९० मते
पराभूत: अभय बळवंत मिरकले (राष्ट्रवादी - अजित पवार गट) – ८,६७२ मते
पराभूत: शेख कलीमुद्दीन अहमद हकीम (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - मविआ) – ७,६९९ मते
प्रभागनिहाय निकाल: विजयी व प्रतिस्पर्धी उमेदवारांची यादी
प्रभाग १
(अ) विजयी: शेख रजिया अफरोज (राष्ट्रवादी - अजित पवार) – १०३० मते
प्रतिस्पर्धी: तांबोळी सानिया शाहिद (राष्ट्रवादी - श.प.) – १०२१ मते
(ब) विजयी: शिवपूजे राहुल गणपती (राष्ट्रवादी - श.प.) – १३८४ मते
प्रतिस्पर्धी: शेख अफरोज रज्जु (राष्ट्रवादी - अजित पवार) – ११२५ मते
प्रभाग २
(अ) विजयी: कांबळे शाहुबाई गोविंदराव (राष्ट्रवादी अजित पवार) – १२६३ मते
प्रतिस्पर्धी: सूर्यवंशी तनुजा सिद्धार्थ (राष्ट्रवादी - श.प.) – ७२१ मते
(ब) विजयी: शेख सद्दाम बाबू (राष्ट्रवादी अजित पवार ) – ७८३ मते
प्रतिस्पर्धी: पठाण गफार खा लाल खा (अपक्ष) – ४५५ मते
प्रभाग ३
(अ) विजयी: बारमळे भाग्यश्री किरणकुमार (राष्ट्रवादी - अजित पवार) – १०५० मते
प्रतिस्पर्धी: शेख मुमताज ताजुद्दीन (राष्ट्रवादी - श.प.) – ९७५ मते
(ब) विजयी: मनियार हुसेन मन्नानसाब (राष्ट्रवादी अजित पवार) – १२७१ मते
प्रतिस्पर्धी: सय्यद रहीम आझम (राष्ट्रवादी - श.प.) – ६१६ मते
प्रभाग ४
(अ) विजयी: देवकत्ते उषा हणमंतराव (भाजप) – ८१८ मते
प्रतिस्पर्धी: शेप मिरा संतोब (राष्ट्रवादी - श.प.) – ७१६ मते
(ब) विजयी: कासनाळे निखील संजय (भाजप) – ९९५ मते
प्रतिस्पर्धी: लखनगीरे बाळासाहेब निवृत्ती (राष्ट्रवादी - अजित पवार) – ५९४ मते
प्रभाग ५
(अ) विजयी: शिंगडे मिनाक्षी दीपक (राष्ट्रवादी) – ९८७ मते
प्रतिस्पर्धी: आगलावे कमलबाई प्रकाश (भाजप) – ९११ मते
(ब) विजयी: चामे अजिंक्य भारत (भाजप) – ९४६ मते
प्रतिस्पर्धी: अलगुले लक्ष्मण नागनाथ (राष्ट्रवादी - श.प.) – ८३१ मते
प्रभाग ६
(अ) विजयी: हालसे कोमल दिपक (शिवसेना - उबाठा) – ८४० मते
प्रतिस्पर्धी: पुणे ललिताबाई वैजनाथ (राष्ट्रवादी - अजित पवार) – ८१९ मते
(ब) विजयी: चौधरी संदीप विरसंगप्पा (शिवसेना - शिंदे गट) – ९५० मते
प्रतिस्पर्धी: कासनाळे लक्ष्मीकांत वैजनाथ (राष्ट्रवादी - अजित पवार) – ५७५ मते
प्रभाग ७
(अ) विजयी: कदम सावनकुमार बाबुराव (राष्ट्रवादी - श.प.) – ८६२ मते
प्रतिस्पर्धी: बनसोडे यशपाल श्रीकांत (राष्ट्रवादी - अजित पवार) – ७०२ मते
(ब) विजयी: बागवान शाहनाजबी फकीरसाब (राष्ट्रवादी अजित पवार) – ७१६ मते
प्रतिस्पर्धी: शेख समरीन जुबेर अहमद (काँग्रेस) – ६७१ मते
प्रभाग ८
(अ) विजयी: तोगरे शिल्पा आशिषकुमार (राष्ट्रवादी अजित पवार) – १०२४ मते
प्रतिस्पर्धी: डावरे शकुंतला विजय (काँग्रेस) – ८०८ मते
(ब) विजयी: शेख आयाज अहमद जहूर (राष्ट्रवादी अजित पवार) – ९७६ मते
प्रतिस्पर्धी: शेख इबदुल्ला हली (काँग्रेस) – ७०८ मते
प्रभाग ९
(अ) विजयी: कोरे किशोर केदारनाथ (राष्ट्रवादी - श.प.) – १२९६ मते
प्रतिस्पर्धी: कानगुले महेश बाबुराव (राष्ट्रवादी - अजित पवार) – ७९७ मते
(ब) विजयी: सय्यद सलामा मोसिन (राष्ट्रवादी अजित पवार) – ९३० मते
प्रतिस्पर्धी: बावस्कर अरुणा बाबुराव (अपक्ष) – ८६५ मते
प्रभाग १०
(अ) विजयी: बागवान शाहनाजबेगम ईस्माईल (राष्ट्रवादी अजित पवार) – ८१८ मते
प्रतिस्पर्धी: सय्यद ताजुद्दीन मोबीन (अपक्ष) – ४४१ मते
(ब) विजयी: हबीब जहुर बेगम सादेख (राष्ट्रवादी अजित पवार) – ११९९ मते
प्रतिस्पर्धी: शेख मेहरून निसा अब्दुल रौफ (राष्ट्रवादी - श.प.) – ४३१ मते
प्रभाग ११
(अ) विजयी: रेड्डी प्रतिक अजित (शिवसेना - उबाठा) – १३४१ मते
प्रतिस्पर्धी: नळेगावकर अनुराधा रत्नाकर (राष्ट्रवादी - अजित पवार) – ४४० मते
(ब) विजयी: भोसले सुलोचना विठ्ठलराव (राष्ट्रवादी अजित पवार ) – ८६२ मते
प्रतिस्पर्धी: पाटील अर्चना अरुण (काँग्रेस) – ५७४ मते
प्रभाग १२
(अ) विजयी: कांबळे प्रदिप बाबासाहेब (राष्ट्रवादी - अजित पवार) – १४४६ मते
प्रतिस्पर्धी: शेटकर सायली अजित ( काँग्रेस) – १११४ मते
(ब) विजयी: रेड्डी शुभांगी अमित (राष्ट्रवादी अजित पवार ) – २२८८ मते
प्रतिस्पर्धी: मुळे वैशाली देवानंद (काँग्रेस) – ७२५ मते
(क) विजयी: मजगे अर्चना निलेश (राष्ट्रवादी अजित पवार) – १८७४ मते
प्रतिस्पर्धी: महाजन निर्मलाबाई सांबाप्पा (काँग्रेस) – ९८० मते
पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): १६ नगरसेवक
भारतीय जनता पार्टी: ३ नगरसेवक + १ नगराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट): ३ नगरसेवक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): २ नगरसेवक
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): १ नगरसेवक
प्रशासकीय व पोलीस बंदोबस्त
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे, सहाय्यक अधिकारी उज्वला पांगारकर, आणि प्रभारी मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांनी परिश्रम घेतले. स्ट्रॉंग रूम प्रमुख संतोष अनर्थे, अभिलाष जगताप , नायब तहसीलदार मुनव्वर मुजावर, नायब तहसीलदार राजा खरात, अव्वल कारकून अर्जुने नामदेव, पारखे, प्रवीण कांबळे, अविनाश पवार, नगर पालिका कर्मचारी संकेत म्हाळस, सुदर्शन कोरे, मनोज कलुरे, कृष्णा धर्माधिकारी, ज्योती रांजणकर, बालाजी कार्ले, स्वरूप चिरके, युनूस शेख ऑपरेटर, सिद्धार्थ कांबळे,यांच्यासह महसूल व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली.
सुरक्षेच्या दृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मित्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे, उपनिरीक्षक रवी बुरकुले, आनंद श्रीमंगल, स्मिता जाधव तसेच पोलीस कर्मचारी आणि होमगार्डच्या पथकाने कडक बंदोबस्त ठेवला होता.
निकालाची घोषणा होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. शहरात आता भाजपचा नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) बहुमत असलेली नगरपालिका महायुती म्हणुन कार्य करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.